तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 4 September 2019

डॉ शिंदे यांच्या वतीने श्री क्षेत्र दत्तवाडी येथे किर्तन कार्यक्रम
प्रतिनिधी
पाथरी:-विधानसभा मतदार संघातील श्री क्षेत्र दत्तवाडी,नैकोटा येथे शिवसेनेच्या वतीने डॉ राम शिंदे यांच्या कडून गुरूवार पाच सप्टेबर रोजी सकाळी साडे नऊ वाजता श्री हभप पदमाकर महाराज देशमुख,अमरावतीकर यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती या मतदार संघातील शिवसेनेचे इच्छूक उमेदवार डॉ राम शिंदे यांनी दिली.
सोनपेठ तालुक्यातील श्रीक्षेत्र दत्तवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या या किर्तन कार्यक्रमा साठी खा संजय जाधव यांच्या सह सेनेचे पाथरी विधानसभा मतदार संघातील सर्व पदाधिकारी उपस्थिती राहाणार असल्याचे डॉ शिंदे यांनी सांगून या किर्तन कार्यक्रमा नंतर नित्य आरती आणि महाप्रसाद होणार असून या कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घेण्याचे आवाहन डॉ राम शिंदे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment