तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 27 September 2019

मनीवाइज वित्तीय साक्षरता सेंटर तालुका समन्वयक पदी विनोद जाधवप्रतिनिधी :- महेंद्रकुमार महाजन जैन 
करंजी (वार्ताहर) :-येथील विनोद जाधव यांची तालुका  समन्वयक म्हणून निवड करण्यात आली त्यांची निवड ही  बँक,नाबार्ड,भारतीय स्टेट बँक ,व्दारा संचालित क्रीसिल फाऊंडेशन च्या माध्यमातुन मनीवाइज वित्तीय साक्षरता सेंटर महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यामध्ये कार्य करित आहे यामधे रत्नागिरी व वाशिम जिल्ह्याचा समावेश आहे व वाशिम जिल्ह्यातील पाच तालुक्यामधे कारंजा, मानोरा, मंगरूळपीर, रिसोड, व मालेगांव या ठीकाणी मनीवाइज वित्तीय साक्षरता सेंटर कार्य करित आहे ऑक्टोबर 2017 मधे विनोद जाधव यांची क्षेञ समन्वयक म्हणून निवड करण्यात आली होती त्यांनी 17 महीने मालेगांव  सेंटर येथे  आपल्या कामाशी तत्पर व काळजी पुर्वक काम केले व नंतर त्यांची बदली रिसोड मनीवाइज सेंटर येथे करण्यात आली 6 महीने त्यांनी आपल्या कामाचा स्पीड कमी न होता वाढवला जिद्द,चिकाटी, व कामाची तळमळ पाहता वरिष्ठ अधिकारी यांनी त्यांच्या कामाची दखल घेतली व त्यांना क्षेञ समन्वयक पदावरून तालुका समन्वयक या पदावर निवड करण्यात आली आपल्या निवडीचे श्रेय शक्ती भिसे महाराष्ट्र राज्य समन्वयक व सत्यपाल चक्रे  जिल्हा समन्वयक  यांना देत आहे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतांना शक्ती भिसे व सत्यपाल चक्रे या वेळी विनोद जाधव यांनी वरिष्ठांचे आभार मानले

महेंद्रकुमार महाजन जैन 
रिसोड प्रतिनिधी 
9960292121
9420352121

1 comment:

  1. जाधव साहेब आपले मनःपूर्वक अभिनंदन

    ReplyDelete