तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 5 September 2019

जसप्रित बुमराहाच्या अदभूत कामगिरी सलाम !                       भारतीय क्रिकेटच्या पटलावर प्रकर्षाने जर कोणते नाव चमकत असेल तर ते आहे जसप्रित बुमराहचे ! याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे त्याची धारदार व प्रभावी गोलंदाजी !  नुकताच भारताने विंडीज दौरा यशस्वीरित्या संपविला. त्यातील कसोटी मालिकेत चमत्कारीक कामगिरी करताना आयसीसी क्रमवारीत तिसऱ्या स्थानी झेप घेतली. सन २०१८ च्या जानेवारीत दक्षिण आफ्रिकेत आफ्रिकेविरुद्ध कसोटी पदार्पण केलेल्या या नवोदित गोलंदाजाने अल्पावधीतच एवढी मोठी मजल मारली. त्याच्या या अदभूत वाटचालीचा थोडक्यात आढावा घेऊया.

                       आज भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार म्हणून विराट कोहली गणला जातो. परंतु त्याचे यश म्हणजे त्याची एकटयाची कर्तबगारी नाही तर ती सांघिक कामगिरी आहे व यात सर्वात मोठा वाटा आहे भन्नाट भानू जसप्रित बुमराहाचा. फक्त १२ कसोटी खेळून जगातील अव्वल तीन गोलंदाजात समाविष्ठ होणे ही सोपी गोष्ट नाही. जानेवारी २०१८ मध्ये बुमराहाने कसोटी पदार्पण केले. त्या सामन्यात बुमराहाने चार बळी घेतले. तीन सामन्यांच्या त्या मालिकेत चौदा बळी बुमराहच्या वाटयाला आले. ऑगष्ट २०१८ मध्ये बुमराहा आयसीसी क्रमवारीत ३८ व्या स्थानी पोहोचला. ऑगष्ट- सप्टेंबर २०१८ मध्ये इंग्लंडमध्ये तीन सामन्यात पुन्हा एकदा १४ बळी मिळविले.

                  सन २o१८ चे वर्ष संपता संपता बुमराहा कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत ३३ व्या क्रमांकावर गेला. डिसेंबर  १८- जानेवारी १९ च्या ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलिया विरुध्द मिळविलेल्या पहिल्या ऐतिहासिक कसोटी मालिकेत या पठ्ठयाने चार कसोटी २१कांगारूंची शिकार केली. या बळावर त्याने ३३ व्या स्थावरुन १६ व्या स्थानी झेप घेतली. विंडीजमध्ये नुकत्याच झालेल्या सामन्यात दोन कसोटी सामन्यात एका हॅट्रीकसह १३ बळी घेत आयसीसीच्या कसोटी गोलंदाजांच्या यादीत तिसरे स्थान पटकविले. इतक्या अल्पकालावधीत इतके वरचे स्थान मिळविणारा बुमराहा पहिलाच कसोटी खेळाडूही ठरला.

               सध्या बुमराहाचे ८३५ गुण असून त्याने ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिंस व द. आफ्रिकेच्या कागिसो रबाडाला मागे सारून तिसरे स्थान मिळविले. पहिल्या कसोटीतील प्रभावी कामगिरीनंतर तो सातव्या क्रमांकावर पोहोचला होता. तर दुसऱ्या कसोटीत हॅट्रीकसह घेतलेल्या सहा बळींमुळे त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोच्य स्थान गाठले.बुमराहाने आता जेम्स अँडरसन, वर्नान फिलँडर व ट्रेंट बोल्टही मागे सारले आहे.

               आपल्या १२ कसोटींच्या छोटेखानी कारकिर्दीत बुमराहाने १९.२४ च्या सरासरीने व २.६४ च्या इकॉनॉमीने ६२ बळी घेतले आहेत. द. आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड व विंडीजच्या भूमिवर डावात पाच किंवा अधिक बळी घेण्याची कठीण कामगिरीही त्याने लिलया साधली आहे.

                बुमराहाच्या कामगिरीचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे त्याचा जागतिक क्रिकेटमध्ये दराराही वाढत आहे. भारतीय संघ सध्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर असून बुमराहाची कामगिरी त्यात मोलाची सिध्द झाली आहे. बुमराहाच्या भांडारातील यॉर्कर हे अतिशय प्रभावी अस्त्र असून जगातल्या कोणत्याही फलंदाजाकडे त्यावर उत्तर नाही. येत्या काही दिवसात दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येत असून त्या मालिकेत नेत्रदिपक कामगिरी करुन आयसीसी रँकीगमध्ये अव्वल ठरण्याची बुमराहाला नामी संधी उपलब्ध आहे.

   

      लेखक : -

दत्ता विघावे 
क्रिकेट समिक्षक.
वर्ल्ड पार्लमेंट सदस्य.

मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल

 प्रतिनिधी भारत.

मोबाईल : - ९०९६३७२०८२

No comments:

Post a Comment