तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 7 September 2019

लढा महाराष्ट्राचा आढावा मतदारसंघाचाअंधेरी पूर्व मतदारसंघ
बाळू राऊत प्रतिनिधी 
मुंबई : मतदारसंघ क्रमांक – १६६, मतदारसंघ आरक्षण – खुला
विद्यमान आमदार – रमेश लटके, शिवसेना
मतदारांची संख्या, पुरुष – १,५७,८९६, महिला – १,२८,३८६, एकूण मतदार – २,८६,२८२
विधानसभा निवडणूक २०१४ निकाल
१) रमेश लटके, शिवसेना – ५२,८१७
२) सुनील यादव, भाजप – ४७,३३८
३) सुरेश शेट्टी, काँग्रेस – ३७,९२९
४) संदीप दळवी, मनसे – ९४२०
५) नोटा – १६३२
मतदानाची टक्केवारी – ५३.४५ %
मुंबईतल्या प्रजा फाउंडेशन मुंबईमधील आमदारांच्या कामाचा लेखाजोखा मांडला आहे. प्रजाने केलेल्या सर्वेक्षणामधून समोर आलेल्या अहवालामध्ये रमेश लटके यांना ४७. ४६ टक्के गुण मिळाले आहेत. अंधेरी पूर्व मतदारसंघ हा मतदारसंघ उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात मोडतो बहुसंख्य मराठी भाषिक असलेले मतदार संघ आहे. पश्चिम रेल्वेचे हे टर्मिनस आहे. सर्वात जास्त गर्दी असणारे हे ठिकाण आहे. मेट्रो रेल्वेने हे स्थानक जोडले आहे.2009 च्या निवडणुकीत सुरेश हिरीयन्ना शेट्टी काँग्रेस यांना ५५९९० व त्यांचे प्रतिस्पर्धी रमेश लटके यांना ५०८३७ मते मिळाली. या निवडणुकीत सुरेश शेट्टी यांचा 5153 मतांनी निसटता पराभव पत्करावा लागला. मनसेचे संदीप दळवी यांना देखील चांगली मते मिळाली. 
मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातल्या इतर मतदारसंघांप्रमाणेच २०१४च्या निवडणुकांमध्ये हा मतदारसंघ देखील काँग्रेसच्या हातून निसटून उजव्या विचारसरणीच्या पक्षांकडे आला. अंधेरी पश्चिमप्रमाणेच अंधेरी पूर्वमध्ये देखील नागरी समस्यांचे मुद्दे महत्त्वाचे ठरतात. याच आधारावर काँग्रेसच्या उमेदवाराला नाकारून इथल्या मतदारांनी शिवसेनेच्या पारड्यात आपलं मत टाकलं होतं. या मतदारसंघात एकूण २५२ मतदान केंद्र आहेत.
सार्वजनिक गणेश मंडळाच्या अध्यक्षपदापासून आपली छाप पाडायला रमेश लटके यांनी सुरुवात केली होती. त्यात त्यांना यश आल्यानंतर १९९७ पासून २०१२पर्यंत सलग ३ वेळा ते मुंबई महानगर पालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून गेले आहेत. त्यानंतर २०१४मध्ये त्यांना शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभेचे तिकीट देण्यात आले. भाजपचे उमेदवार सुनील यादव यांचा जवळपास ५ हजार मतांनी पराभव करत ते आमदार झाले. २०१८मध्ये विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्याआधी त्यांचे सचिव विनोद अग्रवाल यांचा मृतदेह नागपूरच्या आमदार निवासात आढळल्यामुळे वाद निर्माण झाला होता.

No comments:

Post a Comment