तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 4 September 2019

परभणी जिंतूर महामार्ग एक तासभर बंद ट्रक फसल्याने शंभर एक वाहने खोळंबली प्रवास्यांचे हाल हालजिंतूर
ठेकेदार व अभियंत्यांच्या नाकर्तेपणा मुळे जिंतूर परभणी महामार्गावर प्रवास्यांचे प्रचंड हाल होत आहे
खोदलेले रस्ते पूर्ण करण्या ऐवजी खोदकामाची गती वाढवली पण सिमेंटकरण वाढवले नाही
कोणतेही काम प्रवास्यांना व वाहन धारकांना अडचणीचे ठरत आहे
थोडा फार पण पाऊस झाला की कधी रस्ता बंद होईल अशी स्थिती आहे
एस टी महामंडळ व खाजगी वाहन चालक आपला जीव मुठीत धरून वाहने नाईलाजाने चालवत आहेत
परभणी जिल्हयाचे ठिकाण असल्याने शेकडो प्रवासी यांना प्रवास करावाच लागतो एस टी बस ला दीड ते दोन तास लागत आहेत
प्रवासी आणि चालक वाहकांच्या त्रासाला आता अंत राहिला नाही
दररोज नवीन ठिकाणी खोदकाम होते पण सिमेंटकरण मात्र होत नाही
गंगाखेड रोड वर्षा नंतर चालू झाले पण आज पर्यंत अर्धा रस्ता सिमेंटकरण झालंय मग याच महामार्गावर काय  आडवं येतंय हे कळेना

No comments:

Post a Comment