तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 3 September 2019

जागतिक संविधान व संसदीय संघाच्या सदस्य पदी बाबासाहेब वाघचौरे
सात्रळ/प्रतिनिधी  राहुरी तालुक्यात सात्रळ येथील पत्रकार बाबासाहेब वाघचौरे यांची जागतिक संविधान व संसदीय संघाच्या[WORLD CONSTITUTION AND PARLIAMENT ASSOCIATION]च्या सदस्यपदी निवड करण्यात आली.
    निवडीचे प्रमाणपत्र श्रीरामपूर येथील व्ही आय पी गेस्ट हाउस येथे पार पडलेल्या समारंभात प्रमुख अतिथी व कार्यक्रमाचे आर्मी सेवानिवृत्त आबासाहेब पवार,खंडू माळवे,युनायटेड नेशन  ग्लोबल टॅलेट पुल चे भारताचे सदस्य तसेच वर्ड काॅन्स्टुट्युशन असोसिएशनचे आंतरराष्ट्रीय सदस्य, लेखक, साहित्यिक असलेले दत्ता विघावे यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आले.
बाबासाहेब वेडे,लक्ष्मणराव निकम,भाऊराव माळी,भीमराज बागुल,खपके,भोसले,बाबासाहेब वाघचौरे आदी एकूण १३ सदस्यांची आंतरराष्ट्रीय ड्रेस कोडसह नियुक्ती करण्यात आली.
 कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.सूत्र संचालन प्रास्तविक भाऊराव माळी,लक्ष्मणराव निकम यांनी केले.प्रमुख अतिथी खंडू माळवे, आबासाहेब पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संघटनेचे कार्य सांगितले की सुसंवादच शांततामय मार्गाने जगण्याचा मूलमंत्र आहे.अहिंसात्मक मार्गाने जागतिक पातळीवर संबंधित देशात सामंजस्य ठेवता येते.
  जागतिक संविधान व संसदीय संघाचे मुख्यालय अमेरिकेत कोलोरॅडो येथे असून या महासंघाच्या सदस्यपदी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या गुणवान व्यक्तींचा समावेश करण्यात आला असून त्यात प्रामुख्याने बाबासाहेब वाघचौरे (पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते) यांची निवड करण्यात आली असून वेगवेगळ्या स्तरातून अभिनंदन होऊन सत्कार होत आहेत.

No comments:

Post a Comment