तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 30 September 2019

वंचित बहुजन आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी सय्यद सुभान

सुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. ३० _ संपूर्ण तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते प्रकाश आंबेडकर यांचे विचार तळागळापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने गेवराई तालुका वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष म्हणून सय्यद सुभान महेबूब यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
        विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील दमदार नेतृत्व व सामाजिक कार्यकर्ते सय्यद सुभान महेबूब यांची निवड ही वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष जीवनराव राठोड यांनी केली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल संपूर्ण भागात स्वागत होत असून वंचित बहुजन आघाडीचे सुदेश पोतदार, विष्णू देवकते, प्रदीप तुरुकमारे, पप्पू गायकवाड यांच्यासह अनेक पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी सय्यद सुभान यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a comment