तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 5 September 2019

धर्मापुरीत पानमळ्यातील गोडावुनमधुन एक कोटीचां गुटखा जप्त
पोलीस उपअधिक्षक राहुल धस यांच्या सुचनेवरून पोलिस उपनिरीक्षक चाँद मेंडकेनीं केली दबंग कारवाई 

परळीतील तीन पोलीस स्टेशन नुसते नांवालाच

परळी वैजनाथ(प्रतिनिधी) :-  परळी पासुन 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या धर्मापुरी गावालगत असलेल्या पानमळ्यातील गोडावुनवर पी.एस.आय चाँद मेंडके यांनी छापा मारून तब्बल एक कोटी रूपयांचा विक्रीस बंदी असलेला गुटखा व तीन वाहने जप्त केले असुन सर्व मुद्देमाल परळी ग्रामिण पोलीस स्टेशनला जमा करण्यात आला असुन बीडच्या अन्न व औषध प्रशासनाला याची माहिती देण्यात आली असुन त्यांचे अधिकारी परळीला आल्यावर पुढील कारवाई होणार आहे.

परळी शहरात व तालुक्यात राजरोसपणे शासनाने विक्री करण्यास बंदी घातलेला गोव गुटखा चढ्या भावाने विकला जात असुन परळीच्या तीन्ही पोलीस स्टेशनच्या हप्तेखोर कर्मचाऱ्यांचे यांना अभय मिळत
असल्यामुळेच यांचा धंदा जोरात सुरू आहे. मागील महिन्यात 9 तारखेला रात्रीच्या वेळी परळी शहरात एका ट्रक मधु्न 23 लाख रूपयांचा येणारा गोवा,गुटखा अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर यांनी पकडला होता व गुटखा मालकाचे नांव उघड झाले होते मात्र सदर गुटखा मालक तेंव्हा पासुन पोलीस डायरीत फरार असुन प्रत्यक्षात तो उघडपणे शहरात वावरतो अशी चर्चा आहे.त्याचा या धंद्यात असणारा एक भागीदार असुन 23 लाखांच्या गुटखा प्रकरणात त्यांचे नांव वगळले असे शहरात बोलले जात होते.सदर घटनेला महिना होत नाही तोच आज धर्मापुरी गावाजवळील एका  पानमळ्यातील गोडावुनमध्ये शेजारच्या राज्यातुन आलेला  गोवा,गुटखाचा साठा असल्याची गुप्त माहिती पोलीस उपअधिक्षक राहुल धस यांना मिळाल्यावर त्यांनी पी.ए.आय.मेंडके यांना कारवाईचे आदेश दिल्यावर मेंडके यांनी आपली टिम घेवुन सदर गोडावुनवर छापा टाकला असता तेथे तब्बल एक कोटी रूपयांचा गोवा,गुटखा सापडला  तसेच तेथे गुटख्याची वाहतुक करणारा आयशर कंपनीचा टेम्पो क्र.एम.एच.23.1120
बोलेरो गाडी क्र.एम एच.44.5331व नंबर प्लेट नसलेला एक आँपेरिक्षा हि तीन वाहने आढळुन आली हा सर्व मुद्देमाल जप्त करून तो परळी ग्रामिण पोलीस स्टेशनला जमा करण्यात आला व बीडच्या अन्न व औषध प्रशासनाला याची माहिती देण्यात आली असुन त्यांचे अधिकारी परळीत आल्यावर गुन्हा नोंद होणार असे पोलीसांतर्फे सांगण्यात आले आहे.एक कोटी रूपयांचा गोवा,गुटखा पकडल्या प्रकरणी परळी शहरचे पोलिस उपनिरीक्षक चाॅद मेंडकेचे कौतुक होत आहे.

तीन पोलीस स्टेशन नांवालाच .....
परळी शहरात संभाजीनगर पोलीस स्टेशन,शहर पोलीस स्टेशन व परळी ग्रामिण पोलीस स्टेशन असे तीन पोलीस स्टेशन असुन अवैद्य वाळु , मटका, जुगार, अवैद्य हातभट्टीची दारू व गोवा,गुटखा यावर एस.पी.चे , अप्पर पोलीस अधिक्षकाचे तसेच पोलीस उपअधिक्षकांचे पथक परळी शहरात व तालुक्यात येवुन कारवाई करते मग हे तीन पोलीस स्टेशन फक्त नांवालाच आहे का असा प्रश्न कर भरणारे नागरिक करीत असुन पोलीस अधिक्षक यांनी कामचोर पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणिव करून द्यावी असे शहरात बोलले जात आहे.आज गोवा गुटख्याची हि  कारवाई पोलीस उपअधिक्षक राहुल धस याच्यां सुचनेवरून पी.एस.आय.चाँद मेंडके याच्यां पथकात बाबासाहेब बांगर, केंद्रे, गुट्टे , तोटेवाड व हारगावकर यांनी केली.

No comments:

Post a comment