तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 5 September 2019

परळी पोलिसांनी मटका सह गुटखा माफियावर केली कार्यवाहीलाखो रुपयांचा गुटखा सह पत्ते क्लब वर धाडी

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
     परळी शहरात दि.4 रोजी  पो.स्टे.परळी हजर उपविभागीय अधिकारी राहुल धस यांना गुप्त माहिती मार्फत धर्मपुरी येथे गावात अवैधरित्या साठवून ठेवलेल्या गुटखा असल्याची माहिती मिळताच धस याच्या आदेशावरून  पो उ प  नि चाँद मेधके सोबत परळी शहर डी बी पथकाचे बांगर, तोटेवर, बुडे, असे मिळालेल्या माहिती ठिकाणी जाऊन पाहणी केली असता पानमळ या रस्त्यालगत एक आयशर टेम्पो mh23-1120 बंद अवस्तेत उभा असून त्या मध्ये गोवा गुटखा भरलेला होता तसेच टेम्पोचे बाजूस एक पांढऱ्या रंगाचा छोटा हत्ती बंद बॉडीचा ज्यामध्ये अनेक नावाचा पांनमसला टेमोपचे दुसऱ्या बाजूस एक रिकामा पिकअप क्र.MH 44-5331 ज्या मधे गुटखा वाहतूक करण्यास उपयोगात आणणारा असा मिळून आला त्याचे पो.स्टे.परळी ग्रामीण स्टे.डा.नोंद करण्यात आलेली आहे.

    दरम्यान बीड परळी राज्य महामार्गावर दि.5 रोजी  टोकवाडी या ठिकाणी कलाकेंद्र च्या पाठीमागे पत्राच्या शेडमध्ये काही इसम तिरट नावाचा जुगार खेळत असताना धडक कार्यवाही करण्यात आली.   यामध्ये 9 लाख 91 हजार 200 रुपयेचा मुद्देमाल सह 15 आरोपी जेरबंद केले आहे. या धडक कार्यवाहिने परळी शहर हादरून गेले असून एकाच ठिकाणी दोन प्रकारचे अवैध धंदे सुरू असल्याने परळी पोलिसांचे पितळ उघडे पडल्याचे दिसत आहे. यात गुटखा या साठी अन्नभेसळ अधिकारी यांच्याकडून पंचनामा करून वरील वाहन मालकांची माहिती घेऊन पुढील कार्यवाही परळी ग्रामीण पोलीस येथे करण्याची पोलिस उप अधिक्षक अंबाजोगाई यांनी आदेशीत केले आहे. सदर ची कार्यवाही हर्ष पोद्दार साहेब , पोलीस अधीक्षक बीड व श्रीमती स्वाती भोरे,अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई, पोलिस उपअधीक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शन व आदेशाखाली करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment