तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 24 September 2019

म्हणतात.. युती होणारच; आणि.. गेवराईत एका 'नेत्याला' दगाफटका..!सुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. २४ _ येथील विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवार जाहीर करून आठवडा उलटला आहे, शिवसेना - भारतीय जनता पक्षाची युती होणारच आहे असे म्हणटले जात आहे, तसे झालेच तर गेवराईतील एका प्रामाणिक 'नेत्याला' स्वपक्षाकडून इच्छा नसतानाही दगाफटका बसणारच हे सर्वश्रूत आहे ..!
         राज्य व केंद्र सरकारने गेवराई विधानसभा मतदार संघात उत्तम कामे झाली आहेत. भारतीय जनता पक्षाचेे विद्यमान आमदार ॲड. लक्ष्मणराव पवार हे प्रत्येक भागातील रस्त्यांची कामेे करण्यात यशस्वी झाले आहेत, एवढेच नव्हे तर वीज, रस्ता, पाणी आदीसह मुलभूत गरजा सोडविण्यास तत्पर राहीले आहे आणि अशा कर्तु्त्वान व्यक्तीस येथील जनता विसरणे शक्यच नाही. पुुन्हा आमदार म्हणून लक्ष्मणराव आण्णा पवारच पाहिचे आहे म्हणून सामान्य माणूस हा आतूर आहे. अशा परिस्थितीत राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपा युतीचे पडघम वाजू लागले आहे. आचार संहिता लागू होऊन चार दिवस झाली असली अद्यापही पक्षश्रेष्ठी कडून निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. जागा सुटलीच नाही तर ॲड. लक्ष्मणराव पवार निवडणूक लढतीलच असे नाही ! अशा स्थितीत कोणत्या पक्षाकडे 'ही' गेवराईची जागा असेल याबद्दल दोन्ही पक्षाचे व्यक्तनिष्ट कार्यकर्ते चातकाप्रमाणे प्रतिक्षा करत आहेत.
       यापूर्वी शिवसेना - भाजपाच्या युती सरकार मध्ये अर्थातच दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे हे उपमुख्यमंत्री असताना बदामराव आबा पंडित हे ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून कार्यरत होते. गोपीनाथराव मुंडे यांची सुकन्या ना. पंकजाताई मुंडे यांनी देखील गेवराई विधानसभा मतदार संघातील जनतेशी असलेले नाते स्नेहाचे ठेवले आहे, परिणामी मित्रपक्षाशी दुजाभाव करणे त्यांच्या स्वभावातच नसल्याने युतीचा विजय निश्चित मानला जातो. म्हणतात.. युती होणारच; आणि गेवराई येथील एका 'नेत्याला' इच्छा नसतानाही दगाफटका बसेल यात शंकाच नाही.

 ╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a comment