तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 12 September 2019

पर्यावरणपुरक गणेश विसर्जन करा! गणेश मंडळासह प्रशासनाला आवाहनमंगरुळपीर-तालुक्यामध्ये पर्यावरणपुरक गणेश विसर्जन करन्यासाठी सर्व गणेश मंडळे तसेच प्रशासनासह घरी श्री ची स्थापना करणार्‍या सर्व गणेशभक्तांनी काळजी घेवुन या वर्षीचा गणेश विसर्जन सोहळा पर्यावरणपुरक करन्यासाठी सर्वांनी हातभार लावावा असे आवाहन सामाजीक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी केले आहे.
           मंगरुळपीर येथे दि.१३ सप्टेबर रोजी मोठ्या धुमधडाक्यात,वाजतगाजत व ऊत्साहामध्ये व जड अंतःकरणानेही आपल्या लाडक्या बाप्पाला भक्तगण निरोप देणार असुन पुढच्या वर्षी लवकर येन्यासाठी साकडेही घालणार आहेत.या विसर्जन सोहळ्यामध्ये गणेशमुर्तीचे विसर्जन कृञीम तलावामध्ये तसेच जलकुंडीत करावे,अशा कृञीम तलावाची व जलकुंडाची सोय नगर परिषदेने करावी.नदिपाञात किंवा विहीरीमध्ये गणेशमुर्तीचे विसर्जन न करता पर्यावरणपुरक गणेशविसर्जन करावे जेणेकरुन पर्यावरणाला बाधा पोहचणार नाही तसेच पाणीही दुषीत होणार नाही.नदीकाठावर स्वच्छता कशी राहील याकडेही सर्वांनी लक्ष देणे गरजेचे असुन निर्माल्य गोळा करन्यासाठी प्रशासनाने ट्रक्टरचीही सोय करावी.विसर्जनामध्ये कुठलाही अनूचित प्रकार घडणार नाही यासाठी सर्वांनी सजग राहावे व हा विसर्जन सोहळा सर्वांनी एकोप्याने आणी आनंदाने पार पाडावा.सर्वांनी निसर्गाला बाधा पोहचणार नाही याची काळजी घ्यावी व यंदाचा हा ऊत्सव पर्यावरणपुरक करावा.या साठी निसर्गप्रेमीनी पुढाकार घेवून विसर्जनस्थळी प्रबोधन करावे तसेच सर्व गणेशमंडळांनी पर्यावरण समृध्दीसाठी हातभार लावावा असे आवाहन सामाजीक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment