तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 3 September 2019

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या वतीने मानवी साखळी


प्रतिनिधी
पाथरी:-स्वामी रामानंदतिर्थ मराठवाडा विद्यापिठांतर्गत पाथरी येथील स्व नितिन महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाच्या वतीने विद्यार्थी विद्यार्थिनींनी बुधवार ४ सप्टेबर रोजी शहरातून मानवी  साखळी तयार करत देशभक्ती आणि एकतेचे नारे  देत फेरी काढली.
२० ऑगष्ट सदभावना दिवस ते ०५ सप्टेबर या एैक्य पंधरवाड्या निमित्त स्व नितिन महाविद्यालयाच्या रासेयो विभागाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे  आयोजन करण्यात आले आहे.या मानवी  साखळी मध्ये महाविद्यालयातील तरूणी,तरूणी शेकडोंच्या  संखेत सहभागी झाले होते.या वेळी भारत माता  की जय,वंदे  मातरम्, हम सब एक है, हिंदू-मुस्लिम-शिख-इसाई हम सब भाई भाईं चे नारे देण्यात येत होते.या मानवी साखळीत महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा डॉ राम फुन्ने, रासेयो विभाग प्रमुख प्रा मधूकर ठोंबरे, प्रा तुळशिदास काळे, प्रा डॉ हरी  काळे, प्रा डॉ सौ गायकवाड, प्रा डॉ खेडेकर यांच्या सह प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment