तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 2 September 2019

मनिवाइज-वित्तिय साक्षरता समितीच्या प्रयत्नाला आले यशवाशिम  / रिसोड प्रतिनिधी 
              महेंद्रकुमार महाजन
  रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडिया द्वारा संचालित, नाबार्ड व क्रिसिल फाउंडेशनच्या सहकार्याने मनिवाइज-वित्तिय साक्षरता वाशिम जिल्ह्यातील पाच  तालुक्यातील गावागावांत बँक सेवा-सुविधा ऑडिओ, व्हिडीओ स्वरूपात प्रशिक्षण ऑक्टोबर 2017 पासून देत आहे.
त्यामध्ये बचत आणि गुंतवणूक, पेन्शन, विमा, कर्ज, गो-डिजिटल इत्यादी विषयावर प्रशिक्षण दिले जाते. त्या अनुषंगाने कोंडोली येथील रवी नारायण काळे यांनी विमा विषयी प्रशिक्षण घेतले व मनिवाइज तालुका कार्यालया अंतर्गत पंतप्रधान जीवन ज्योती विमाचे संमती पत्र दिले. संबंधित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा मानोरा मध्ये कामाच्या व्यापामुळे लिंकेज न होता, एक महिन्याच्या कालावधीत रवी काळे यांचा नैसर्गिक मृत्यू झाला, त्यानंतर तालुका मानिवाइज वित्तिय साक्षरता समिती तालुका मानोरा अध्यक्ष श्री. द्धम्मरक्षक पाढेंन यांनी जिल्हा पातळीवर कार्यवाही केली, पुढे लगेचच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चे नोडल अधिकारी मा. विनोद सरनाईक यांनी आत्मीयतेने सहकार्य केले., तसेच  मा. रमेश कटके, जिल्हा उपनिबंधक वाशिम, वाशिम लीड बँक (एसबीआय) व्यवस्थापक मा. दत्तात्रय निनावकर सर,  नाबार्ड जिल्हा व्यवस्थापक मा. विजय खंडरे सर यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन रवी काळे च्या आईला विम्याचा लाभ दोन लाख मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न करीत मा. जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शनात महिलेला लाभ मिळवून दिला.
सतत मनिवाइज वित्तिय साक्षरता वाशिम जिल्हा समन्वयक मा. सत्यपाल चक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी गावपातळीवरील वित्तिय साक्षरता प्रशिक्षण दिले जात आहे. बँकांचे मोठ्या प्रमाणावर असलेले कामाचे स्वरूप पाहता सर्व बाजूने सेवा उपलब्ध करून सातत्याने सर्व बँक सेवा देतात. या प्रकरणी मा. जिल्हाधिकारी, तसेच मा. एलडीएम दत्तात्रय निनावकर, नाबार्ड जिल्हा व्यवस्थापक खंडरे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नोडल अधिकारी मा. विनोद सरनाईक, जिल्हा उपनिबंधक मा. कटके सर याचे मनिवाइज  तालुका समिती तालुका मानोरा शतशः आभारी आहे.

महेंद्रकुमार महाजन जैन रिसोड 
9960292121

No comments:

Post a Comment