तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 13 September 2019

छत्रपती पब्लिक स्कुल केदारखेडा येथे श्रीगणेशाचे आगळ्या-वेगळ्या पध्दतीने विसर्जन.जलप्रदुषण टाळण्यासाठी कुंडीमध्ये केले विसर्जन, त्याच कुंडीमध्ये फुलाचे रोप लावण्याचा केला संकल्प.
शाडु मातीच्या मुर्तीची करण्यात आली होती स्थापना.

गणेश एन. सोळुंके (भोकरदन ग्रामीण)
--------------------------------
केदारखेडा : केदारखेडा येथील छत्रपती पब्लिक स्कुल मध्ये लाडक्या गणरायाची दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर बाप्पाला गुरुवारी निरोप देण्यात आला गणरायाला निरोप देण्यात आला. बाप्पाला निरोप देताना सर्वांच्याच मनात चलबिचल चालू होती. तर चिमुकल्यांचे डोळे पाणावले होते. बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या असा आग्रह धरुन गणरायाला निरोप दिला गेला.
दुष्काळामुळे नद्या आणि विहिरी कोरड्याठाक असल्याने व जल प्रदुषण टाळण्यासाठी गणेश मुर्तीची विधीवत पुजा करुन तिचे कुंडीमध्ये विसर्जन करण्यात आले. या मुर्तीचे पाण्यात विघटन होण्यासाठी शाडु मातीच्या मुर्तीची स्थापना करण्यात आली होती. मुर्ती पाण्यात पुर्णत: विरघळल्यानंतर त्यात एक फुलाचे रोपटे लावणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष काकासाहेब मुरकुटे यांनी सांगितले. जेणे करुन या पवित्र मातीमध्ये रोपटे लावल्यावर श्रीगणेशाचा कृपाशिर्वाद, सहवास आमच्या शाळेवर कायमच राहील, यात वाढणारे रोपटे पर्यावरणासाठी मोठे लाभदायी व योगदाई ठरेल तसेच आमच्या शाळेतील चिमुकल्यांची पर्यावरणवादी विचारसारणी समृध्द करेल. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक गणेश सोळुंके, उपमुख्याध्यापिका सुवर्णा सोळुंके, सहशिक्षिका दया पवार, वर्षा गव्हाणे, विद्या नागलोत, सुजाता काळे, रोहित मोरे यांच्यासह सविता जाधव, संजय ठोंबरे, अन्सार शेख, ज्ञानेश्वर जाधव, योगेश मुरकुटे, मंगेश ठोंबरे यांची उपस्थिती होती.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी : गणेश एन. सोळुंके, भोकरदन ग्रामीण.
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं.7888257555
व्हाॅट्स अॅप : 8390132085  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment