तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 13 September 2019

शनिवारी गेवराईत राष्ट्रीय चर्चासत्र कृष्णा भोगे, अमर हबीब येणार
सुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. १३ _ येथील र. भ .अट्टल महाविद्यालयात शनिवार, १४ सप्टेंबर २०१९ रोजी 'भारतातील समकालीन समस्या आणि उपाय' या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या राष्ट्रीय चर्चासत्राचे उदघाटन व बीजभाषण माजी विभागीय आयुक्त मा. कृष्णा भोगे औरंगाबाद, हे करणार आहेत. द्वितीय सत्रात सुप्रसिद्ध पत्रकार मा. अमर हबीब यांचे 'भारतातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि उपाय' या विषयावर व्याख्यान होणार आहे.
           या चर्चासत्रात विविध ठिकाणांहून शोधनिबंध सादर करण्यात आले असून तृतीय सत्रात आदर्श गाव पाटोदा ता. जि. औरंगाबाद येथील सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते श्री भास्करराव पेरे पाटील यांचे' ग्रामीण  विकासाच्या संधी आणि आव्हाने' या विषयावर मार्गदर्शन मिळणार आहे. या राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रजनी शिखरे यांनी केले आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment