तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 12 September 2019

हादगाव बु. येथे आ दुर्रानी यांच्या हस्ते शादीखाना भुमीपूजन सोहळाप्रतिनिधी
पाथरी:- आ बाबाजानी दुर्रांनी यांच्या स्थानिक विकास निधीतून हादगाव बु. येथिल इंदिरानगर भागात २५ लक्ष रुपये निधी खर्च करून मुस्लिम समाजा साठी भव्य शादीखान्याचे उदघाटन सोमवार १६ सप्टेबर रोजी आ बाबाजानी दुर्रानी यांच्या हस्ते सकाळी अकरा वाजता इंदिरा नगर येथे संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जि प उपाध्यक्षा भावनाताई नखाते या राहाणार आहेत तर प्रमुख उपस्थितीत मुंजाजी भाले पाटील, दादासाहेब टेंगसे, अनिल नखाते, सुभाषराव कोल्हे,कुंडलिकराव सोगे,एकनाथराव शिंदे,राजेश ढगे, रमेश तांगडे, राधाकिशन डूकरे, आशोकराव गिराम श्रीकिशन नखाते यांची या वेळी उपस्थिती राहाणार आहे. या कार्यक्रमा साठी जास्तितजास्त संखेने उपस्थित राहाण्याचे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे तालुका उपाध्यक्ष शेख आशफाक आणि ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

1 comment: