तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 25 September 2019

सनातन्यांच्या उरावर थयथयाट करणारे सत्यशोधक समाज हाच एकमेव उपाय - सपना माळी, सामाजिक युवा कार्यकर्त्या




महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. *सप्टेंबर २४, इ.स. १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.*

ब्राम्हण वर्गाकडून होणार्‍या अन्याय, अत्याचारापासून , गुलामगिरीतून बहुजन समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.

*‘सार्वजनिक सत्यधर्म’* हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ आहे.

*‘दीनबंधू’* साप्ताहिक मुखपत्र म्हणून चालविले जात असे.

*'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥'* हे समाजाचे घोष वाक्य होते.

सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली.

सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरवात केली.

समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.

पार्श्र्वभूमी :
एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास पाश्चात्त्य सुधारणेचे स्वागत करणाऱ्या प्रवृत्तीचे तीन प्रवाह महाराष्ट्रात स्वतंत्र रीत्या प्रभावीपणे वाहताना दिसतात.
- पहिला प्रवाह, धार्मिक सुधारकांचा असून तो मुख्यत्वे ⇨ बाह्मो समाज (स्थापना १८२८) व ⇨ प्रार्थनासमाज (स्थापना १८६४) यांत व्यक्त झाला आहे. न्यायमूर्ती ⇨ महादेव गोविंद रानडे, ⇨ रामचंद्र गोपाळ भांडारकर, महर्षी ⇨ विठ्ठल रामजी शिंदे, न्यायमूर्ती ⇨ नारायण गणेश चंदावरकर इ. मंडळी यात अगणी होती.
- दुसरा प्रवाह, बुद्धीवादी ब्राह्मण सुधारकांचा होता. आगरकरांसारखे जडवादी किंवा अज्ञेयवादी त्यात अगेसर होते.
- तिसरा मोठा प्रवाह, ब्राह्मणी संस्कृतीच्या विरूद्ध बंड करणाऱ्या बाह्मणेतरांच्या - बहुजनसमाजाच्या - चळवळीचा होता. ह्याचे आद्यजनक महात्मा जोतीराव फुले होते.

*या तिन्ही सुधारणा प्रवाहांची सर्वसंमत वैशिष्टये अशी :*
पाश्र्चात्त्य विज्ञान पूर्णतः स्वागतार्ह आहे.  धर्माशी प्रत्यक्ष सोयरिक नसलेले आधुनिक शिक्षण हाच खरा सुधारणेचा पाया आहे.  चातुर्वण्याचे तत्त्वज्ञान किंवा जातिभेद ही संस्था व्यक्तिविकासाला मारक व एकात्म समाजाच्या घडणीतील अडसर असल्यामुळे तिचे समूळ उच्चटन व्हावे, कारण व्यक्तिस्वातंत्र्याच्या पायावर लोकसत्ताक राज्यव्यवस्था भारतात निर्माण होण्याची गरज आहे. मात्र तत्पूर्वी सामाजिक परिवर्तनाची नितांत आवश्यकता आहे. या सर्व तत्त्व-सूत्रांचा प्रारंभ कुटुंबसंस्थेत आणि विवाहसंस्थेत बदल करण्यापासून होतो. त्याकरिता स्त्री-शिक्षण व स्त्री-स्वातंत्र्य यांचा पुरस्कार अपरिहार्य ठरतो. ही सर्वसंमत वैशिष्टये या तिन्ही सुधारणा प्रवाहांत - चळवळीत असली, तरी महाराष्ट्रातील बहुजनसमाजातील सुधारकांचे - बाह्मणेतर सुधारकांचे-प्रश्न मागासलेल्या बहुसंख्य जनतेच्या जीवनाशी निगडित, तर ब्राह्मण सुधारकांचे प्रश्न पांढरपेशा उच्च्वर्णीयांच्या जीवनाशी संबद्ध होते. त्यामुळे हिंदू धर्माच्या पूर्वपरंपरेवर मूलोच्छेदी प्रहार करण्याची तीव्र व कठोर प्रवृत्ती निर्माण झाली आणि साधारणतः प्रार्थनासमाजाच्या धर्तीवर पण शूद्रातिशूद्रांच्या खास उद्धारार्थ सत्यशोधक समाजाची स्वतंत्र, स्वावलंबी व पुरोगामी विचारांची संघटना स्थापन करण्यात आली.

महात्मा फुले यांच्या या उच्छेदक प्रवृत्तीला अनेक कारणे आहेत. त्यांतील अत्यंत महत्त्वाचे म्हणजे *पेशवाईच्या उत्तरार्धामधील ब्राह्मणी वर्चस्वाचा काळ. या काळात, ब्राह्मणी राज्यात जातिभेदाची तीव्र अंमलबजावणी, बाह्मणेतर जातींना दडपण्याची राज्यकर्त्यांची प्रवृत्ती, शूद्राति-शूद्रांची बेफाट पिळवणूक, कायद्याच्या अंमलबजावणीतील ढळढळीत पक्षपात, बेसुमार भ्रष्टाचार व लाचलूचपत अशी बेबंदशाही व अनागोंदी होती. साहजिकच त्या काळी महाराष्ट्रातील ग्रामीण व नागरी सामाजिक जीवनात बाह्मणांचे धार्मिक व प्रशासकीय क्षेत्रांत पूर्ण वर्चस्व होते. परंपरागत हिंदू धर्माच्या चौकटीच्या पकडीत सर्व समाज गुरफटला होता. त्याचा प्रवर्तक व समर्थक वर्ग विशेषेकरून ब्राह्मण वर्ग होता.*

*ह्या चौकटीविरूद्ध बंड करणारी प्रवृत्ती, सत्यशोधक समाजाच्या रूपाने जागृत झाली आणि मानसिक गुलामगिरी नष्ट करण्यासाठी म. जोतीराव फुले यांनी सत्यशोधक समाजाच्या रूपाने धगधगणाऱ्या बंडाचे निशाण हाती घेतले. धर्माचे मनुजवैरी गुंतवळ आणि ते जपणारे समाजघटक यांच्या अनिष्ट प्रवृत्तींविरूद्ध, जवळजवळ सर्व आघाडयावर त्यांनी युद्ध पुकारले.*

समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. सत्यशोधक समाज सोसायटीचे ते पहिले अध्यक्ष आणि खजिनदार होते. वेदांना झुगारून त्यांनी हे कार्य करण्यास सुरवात केली. त्यांनी जातीय भेद आणि चातुवर्णीय भेदभावास विरोध करण्यास सुरवात केली. महात्मा फुले 

No comments:

Post a comment