तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 4 September 2019

हागणदारीमुक्त ग्रा.पं पडताळणी टप्पा-२ अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न


फुलचंद भगत
 मंगरुळपीर दि. ४ सप्टेबर, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना साहेब यांच्या निर्देशानुसार ऊप मु.का.अ. सुदाम ईस्कापे सर आणि मा. ग.वि.अ. ज्ञानेश्वर टाकरस सर यांच्या मार्गदर्शनाखाली हागणदारीमुक्त ग्रा.पं पडताळणी टप्पा-२ अंतर्गत मंगरुळपीर तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न झाली.  यावेळी जालल्हा कक्षाचे माहिती शिक्षण संवाद सल्लागार राम श्रृंगारे आणि मुल्यांकन व संनियंत्रण सल्लागार विजय नागे यांनी ऊपस्थितांना प्रशिक्षण दिले. यावेळी उपस्थित प्रशिक्षणातरीकडून SSG2019 feedback/अभिप्राय देखील नोंदवून घेण्यात आले. मंचावर पंचायत विस्तार अधिकारी आर. के. राऊत, सांखिकी विस्तार अधिकारी अविनाश ठाकुर, कृषी अधिकारी रोहिणी मोघाड, आय.सी.डी.एस. चे विस्तार अधिकारी संतोष राऊत यांची ऊपस्थिती होती. तालुका समन्ववक अभिजित गावंडे आणि ज्ञानेश्वर महाले यांनी कार्यक्राचे संचलन केले. कार्यशाळेला पडताळणी समितीचे सदस्य स्वच्छाग्रही, आशा, अंगणवाडीसेविका, जलसुरक्षक, महिला बचत गटाच्या सदस्यांची ऊपस्थिती होती.

फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206

No comments:

Post a Comment