तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 6 September 2019

जिंतूर: बामणीत कर्तव्यावर असलेल्या होमगार्ड चे ह्रदय विकाराने निधनजिंतूर- येथील पोलिस स्टेशनला नेहमी ड्युटी करीत असलेले होमगार्ड नारायण सिताराम जाधव यांचे  गणपती बंदोबस्ता दरम्यान ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने जागीच मृत्यू झाला आहे.
        सध्या गणपती उत्सव निमित्याने परभणी जिल्हाभरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे .पोलिसांसह होमगार्ड सुद्धा तितकेच बंदोबस्ता मध्ये व्यस्त असतात .बामणी पोलिस स्टेशनला ड्युटी वर कर्तव्य बजावत असतांना बामणी येथीलच नारायण सिताराम जाधव (वय45)हे रात्री पाळी ची ड्युटी करीत असतांना दि.6 सप्टेंबर रोजी पहाटे 5 वाजेच्या दरम्यान त्यांना अस्वस्थ वाटत असतांना पोलिस स्टेशन पासून काही अंतरावरच त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी धावून गेले आणि जिंतूर येथिल दवाखान्यात डॉक्टर यांनी मृत घोषित केले होते. त्याच्या अंतसंस्काराच्या वेळी बामणी पोलिस स्टेशनचे सपोनि नितीन काशीकर ,पो. उप. निरीक्षक सुनिल पल्लेवाड , होमगार्ड विभागाचे समादेशक आर. एस. जाधव  व होमगार्ड आणि पोलिस कर्मचारी तसेच गावकरी मंडळी मोठया प्रमाणात हजर होते.कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्काराच्या वेळी सलामी दिली.नारायण जाधव हे दिलखुलास व्यक्ती महत्वाचे होते .यांच्या पच्यात पत्नी ,दोन मुली , एक मुलगा आई असा परिवार होता .यांच्या निधनानंतर बामणी गावात शोककळा पसरली आहे.

No comments:

Post a Comment