तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 2 September 2019

प्रेम प्रकरणातुन युवकाचा खुन ; तीन्ही पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर घडली घटना ; परळी शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः-
आज सकाळी परळी शहर, संभाजीनगर व ग्रामिण पोलिस ठाण्याच्या मधोमध असलेल्या स्मशानभुमित युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. ही घटना प्रेमप्रकरणातुन घडल्याचे समोर आले असुन खुन झालेला युवक हा गणेशपार भागातील अनिल बसवेश्‍वर हालगे (22) हा असुन या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली. याप्रकरणी महेश शिवराजअप्पा हालगे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात आरोपी विरुध्द परळी शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मुस्लिम समाजाच्या स्मशानभुमित आज सकाळी 08 वाजता अज्ञात युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली सदरील मृतदेहाच्या चेहर्‍यावर व डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुना आढळल्या व गळ्यात दोरी आढळ्याने हा खुनाचा प्रकार गृहीत धरुन पोलिस कामास लागले. ही बातमी शहरात कळताच सदरील मृत युवक हा अनिल बसवेश्‍वर हालगे वय 22 रा.गणेशपार येथील असल्याची ओळख पटली. पोलिसांनी तपासाचे चक्रे फिरवत दिवसभर अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. याबाबत महेश हालगे यांच्या फिर्यादीवरुन परळी शहर पोलिस ठाण्यात गु.र.नं.179/19 कलम 302 अन्वये अज्ञात आरोपी विरुध्द गुन्दा दाखल करण्यात आला असुन या फिर्यादीत सदरील घटनाही प्रेम प्रकरणातुन झाल्याचे नमुद करण्यात आले आहे. दिवसभर चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या युवका पैकी पाच जणांची कसुन चौकशी करण्यात आली. यामध्ये दोघांनी खुनाची कबुली केली असुन हे दोघेही अल्पवयीन आहेत.  सदरील घटना घडलेले ठिकाण हे परळी शहर, संभाजीनगर व ग्रामिण पोलिस ठाणे या तीन्ही पोलिस ठाण्यांच्या मध्ये व हाकेच्या अंतरावर असुन घटनास्थळापासुन शंभर मिटर अंतरावर असलेल्या बसवेश्‍वर चौकात सीसीटीव्हीची यंत्रणा कार्यान्वीत आहे. त्यामुळे या घटनेचा तपास पोलिसांना तात्काळ करता आला. सदरील घटनेची माहिती कळताच पोलिस उपअधिक्षक राहुल धस यांनी परळीस भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

No comments:

Post a Comment