तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 5 September 2019

प्रा. गोविंद वाकणकर यांच्याकडून जि. प. शाळेस दहाहजार रूपयांची देणगी


सोनपेठ :  येथील कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयात कार्यरत असलेले प्रा. गोविंद वाकणकर यांनी 10000 रूपयाची देणगी हशिप्रमंचे अध्यक्ष परमेश्वरराव कदम व प्राचार्य डॉ वसंत सातपुते यांच्या प्रेरणेने जी. प. प्राथमिक शाळा आबेगाव यांना दिली.
शहरातील कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयात कार्यरत असणारे व नाथ्रा येथील भुमिपुत्र प्रा. गोविंद वाकणकर यांनी जी. प. शाळा आबेगाव ता. माजलगाव जी. बीड,  लोकसहभागात 10000 रूपयाची मदत केली आहे. तालुक्यात नविन आदर्श घडवत असलेल्या आबेगावच्या ग्रामस्थांनी शाळेसाठी लोकसहभागातून मोठे काम केलेले आहे. शाळेसाठी दिडएकर जागा व इमारतीचे बांधकाम त्यांनी केले आहे, अशा गावकऱ्यांच्या प्रेरणेत व सतत वंचितांपर्यंत शिक्षण पोहचवण्याचा प्रयत्न करणारे हशिप्रमंचे अध्यक्ष परमेश्वरराव कदम व प्राचार्य डॉ. वसंत सातपुते यांच्या प्रेरणेने हे कार्य केले यावेळी आशोक शेजूळ, दाढेल सर, दयानंद स्वामी, डांगे सर, गणेश निरपणे, लक्ष्मण जाधव, शेषेराव शिंदे, अजय शेजूळ, विनोद होके, चंद्रकांत सातपुते, प्रा. डॉ. संतोष रणखांब व इतर सर्वजण उपस्थित होते.

No comments:

Post a Comment