तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 6 September 2019

राज्यसेवा परीक्षा-२०१७’ समांतर आरक्षणाबाबत याचिका निकाली एमपीएससी’कडून सुधारित निकाल घोषित होताच उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठविणार; सामान्य प्रशासन विभागाचा खुलासा


बाळू राऊत प्रतिनिधी
मुंबई, दि. ६: राज्यसेवा परीक्षा-२०१७ च्या निकालाच्या अनुषंगाने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये एका उमेदवाराने समांतर आरक्षणाशी संबंधित याचिका दाखल केली होती. ही  याचिका तसेच समांतर आरक्षणाबाबतच्या इतर याचिकांवरील विशेष सुनावणी होऊन मुंबई उच्च न्यायालयाने दिनांक ८ ऑगस्ट २०१९ रोजी अंतिम आदेश दिले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत या परीक्षेचा सुधारित निकाल घोषित करण्यात येणार आहे. त्यानंतर आयोगाकडून शिफारस होणाऱ्या उमेदवारांना सर्व पूर्तता करुन प्रशिक्षणासाठी रुजू करुन घेण्यात येणार आहे, असे स्पष्टीकरण सामान्य प्रशासन विभागाने दिले आहे.

‘शासनाच्या दुर्लक्षामुळे ३७७ अधिकाऱ्यांवर अन्याय’ या शिर्षकाखाली दि. ५सप्टेंबरच्या दै. पुण्यनगरीमध्ये प्रसिद्ध वृत्ताच्या अनुषंगाने हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, राज्यसेवा परीक्षा-२०१७ च्या निकालाच्या अनुषंगाने  श्रीमती शिल्पा साहेबराव कदम यांनी उच्च न्यायालयच्या औरंगाबाद खंडपीठात समांतर आरक्षणाशी संबंधित याचिका क्रमांक ६५७८/२०१८ केली होती. त्यावरील दिनांक १२ जुलै २०१८ रोजीच्या विशेष सुनावणीवेळी न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने या उमेदवारांना  नियुक्ती देण्यात आलेली नाही. या समांतर आरक्षण  संदर्भातील  याचिकेवरील  सुनावणी  दिनांक २७ सप्टेंबर २०१८ रोजी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये झाली होती. तथापि, याबाबतचा निकाल उच्च न्यायालयाने घोषित न केल्यामुळे या उमेदवारांचे प्रशिक्षण सुरु करणे शक्य झाले नाही. ही याचिका तसेच समांतर आरक्षणासंदर्भातील इतर याचिका यावरील विशेष सुनावणी दि. २१ जुलै २०१९ रोजी मुंबई उच्च न्यायालय येथे झाली असून उच्च  न्यायालयाने  दि. ८ ऑगस्ट २०१९ रोजी अंतिम आदेश  दिले आहेत, अशीही माहिती देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment