तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 4 September 2019

परळीतील खुन प्रकरणातील त्या दोन अल्पवयीन आरोपींची बाल सुधारगृहात रवानगीपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
परळी शहरात काल घडलेल्या खून प्रकरणात खुनाची कबुली देणार्या दोन अल्पवयीन आरोपींना  परळी शहर पोलिस पोलिसांनी आज दि.3 सप्टेंबर रोजी बीड येथील बाल न्याय मंडळात हजर केले व तेथुन त्या दोन आरोपींची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली. अवघ्या 16 ते 17 वर्षे वयाच्या बालकांनी ब्लेडचे वार करत दगडाने ठेचून खुन केल्याने एकच खळबळ उडाली होती.
 काल दि.2 सप्टेंबर रोजी सकाळी परळीकर गणेशाच्या आगमनाची तयारी करत असताना एका 23 वर्षीय युवकाचा मृतदेह शहर पोलिस ठाण्याशेजारील मुस्लीम स्मशानभूमीत आढळून आला.तो मृतदेह अनिल हालगे रा.गणेशपार याचा असल्याची ओळख पटल्यानंतर ही घटना खुनाची असल्याचा अंदाज घेत पोलिसांनी दिवसभर अनेकांची चौकशी केली यात दोन कुमारावस्थेतिल युवकांनी आम्ही खून केल्याची कबुली दिली.मयत अनिल चा चुलत भाऊ महेश याने दिलेल्या फिर्यादीत अनिल हालगे याचा प्रेम प्रकरणातून खून करण्यात आल्याचे नमुद केल्यानंतर चौकशीसाठी आणलेल्या त्या दोन बालकांची पोलिसांनी कसुन चौकशी केली. या चौकशीत दोघापैकी एकाच्या बहिणीचे अनिल सोबत प्रेमसंबंध होते आणि याच्या रागातूनच त्याने आपल्या मित्रास सोबत घेवुन अनिलची हत्या केल्याचं  पोलीस तपासात समोर आले. विशेष म्हणजे या हत्येमध्ये अनिलच्या पूर्ण शरीरावरती जे वार करण्यात आले ते वार ब्लेडने करण्यात आले होते.
ताब्यात घेतलेल्या दोन्ही विद्यीसंघर्षग्रस्त बालकांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर  तसेच हत्येत वापरलेले दगड, ब्लेड आणि तुकडे केलेला मयताचा मोबाईल पोलिसांना दिल्यानंतर त्यांच्याविरुध्द परळी शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.या दोघांना आज दि.3 सप्टेंबर रोजी बीड येथील बाल न्याय मंडळात हजर करण्यात आले तेथुन त्यांची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment