तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 5 September 2019

प्रवरा सांस्कृतिक महोत्सवात ह.भ.प.रामकृष्ण शिंदे यांचा भारुडाचा कार्यक्रम संपन्नसात्रळ/प्रतिनिधी
बाबासाहेब वाघचौरे 
बुधवार  दिनांक ४ रोजी प्रवरा सामाजिक प्रबोधन  व क्रीडा महोत्सव अंतर्गत  ह.भ.प.रामकृष्ण शिंदे, वैजापूर  व ह.भ.प. गंगाराम महाराज थोरे यांचा भारुडाचा कार्यक्रम संपन्न झाला.

सदर भारुडाच्या कार्यक्रमात ह.भ.प.रामकृष्ण शिंदे यांनी एकनाथ महाराज भारूडातून कसे प्रबोधन करत होते हे सांगून त्यात किती विविधता होती साऱ्या  जीवनाचे अवलोकन आणि चिंतन या भारुडांमधून व्यक्त केले गेले त्यांच्या  भारुडांच्या रचनेत अध्यात्म, मनोरंजन, दोष-दुर्गुणांचे भंजन तसेच गूढगुंजन आध्यात्मिक उद्बोधन, व लोकरंजन केले गेले विशेष म्हणजे त्यांनी भजनी भारुड ,सोंगी भारुड इ. प्रकार हे स्री च्या वेशात  अति उत्तम गायन करून सात्रळ पंचकृशीतील ग्रामस्थांना सध्याच्या युगात पूर्वीच्या युगापेक्षा काय त्रुटी आहेत हे एखाद्या अभिनेता/ अभिनेत्रीला लाजवेल या प्रकारे कला करून  प्रबोधन/ लोकरंजन  केले.

या प्रसंगी सदर प्रसंगी स्कूल कमिटीचे अध्यक्ष मा.अड.बाळकृष्ण चोरमुंगे, मा.जयवंत जोर्वेकर, मा.विश्वासराव कडू, मा.मच्छिंद्र अंत्रे, मा.कारभारी ताठे  मा.रमेशअण्णा पन्हाळे, मा.नारायण घनवट, मा.नरहरी घोलप, मा.ऋषीकेश अंत्रे,  परिसरातील ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, पंचक्रोशीतील युवक सर्व शाळा महाविद्यालयातील शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी  आदीनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. या धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा महोत्सवात दि. १० रोजी वाणी भूषण ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील ,ठाणे यांच्या जाहीर किर्तनाचा  लाभ आजच्या प्रमाणेच  पंचक्रोशीतील नागरिकांनी घ्यावा असे प्रतिपादन महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती जयश्री सिनगर व  उपप्राचार्य दीपक घोलप यांनी केले.

No comments:

Post a Comment