तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 4 September 2019

साखरा हिवरखेडा हत्ता येथे ऐन सणासुदीच्या काळात ही लाईट नाही महावितरणचा गलथान कारभारसाखरा प्रतिनिधि शिवशंकर निरगुडे 

साखरा परिसरातील गावात तसेच साखरा हिवरखेडा बोरखेडी धोतरा सह आदि गावच्या   लाईन चा नेहमीचाच लपंडाव असते, त्यामुळे महावितरणच्या या गलथान कारभाराला नागरिक त्रस्त झाले आहेत, पण या प्रकाराकडे वरिष्ठ अधिकारीही लक्ष देत नसल्याचे दिसत आहे, तसेच लोकप्रतिनिधीचे लक्ष नाही, त्यामुळे नेहमीच लाईन चा लपंडाव चालू असतो, मात्र आता गणेश उत्सव, तसेच महालक्ष्मीचा सण आहे, तरीसुद्धा लाईट नसल्यामुळे गावकर यांमधून महावितरणच्या  कारभाराबद्दल संताप व्यक्त होत आहे. या अशा कारभारामुळे शिवसेनेने शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश भाऊ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयात आंदोलन केले होते, त्यांना तात्पुरते तोंडी आश्वासन दिले मात्र अद्यापही लाईट सुरळीत झालेली दिसत नाही, त्यामुळे वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी या प्रकरणाकडे लक्ष देऊन सेनगाव तालुक्यातील लाईटचा कारभार व्यवस्थित करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

...............
 तेज न्यूज़ हेड लाइन्स ऑनलाइन वेब वाहिनी 

साखरा प्रतिनिधि शिवशंकर निरगुडे

No comments:

Post a comment