तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 4 September 2019

सेनगाव शहरात साठे नगरातील विकास कामाचे भूमिपूजन(विश्वनाथ देशमुख सेनगावकर)

सेनगाव:-येथील प्रभाग क्रमांक 16 साठेनगर मध्ये हिंगोली विधानसभा सदस्य आमदार तानाजी मुटकुळे यांच्या आमदार विकास निधीतून 10 लाख रुपये सिमेंट रोड कॉंक्रिटीकरण या विकास कामाचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सेनगाव नगरपंचायत अंतर्गत आमदार तानाजी मुटकुळे यांच्या विकास नेतृत्व अंतर्गत कोट्यवधी रुपयाची कामे सेनगाव शहरात चालू आहेत तर काही पूर्णत्वास  गेली आहे त्यामध्ये शनिवार शहरातील पाणी पुरवठा योजना शहरातील मुख्य रस्त्याचे नव्याने निर्माण व तसेच संपूर्ण शहरातील एकूण प्रभाग 17 मधील गल्लीतील व चौकामधील असलेले रस्ते नव्याने करण्यात येत आहे या सर्व विकास कामासाठी आमदार मुटकुळे यांनी कोट्यावधी रुपयाचा निधी सेनगाव शहराचा सर्वांनी विकास करण्यासाठी शर्तीने प्रयत्न करून ते तडीस नेऊन पूर्ण केले आहे त्यानुषंगाने संपूर्ण शहराचा सर्वागीण विकास होत असल्याचे चित्र संपूर्ण शहरात पहावयास मिळत आहे शहरातील प्रभाग क्रमांक 16 साठे नगरातील आमदार मुटकुळे यांच्या आमदार विकास निधीतून 10 लाख रुपयांचा निधी प्रभागातील  रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण यासाठी निधी देण्यात आला या विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले असून यामध्ये भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष दिनकरराव देशमुख,भाजपा ज्येष्ठ नेते आप्पासाहेब देशमुख तालुकाध्यक्ष अशोक ठेंगल,माजी सभापती शंकरराव बोरुडे,माजी नगराध्यक्ष इंजि.अभिजीत देशमुख,नगरसेवक दीपक फटांगळे,मनोज तिवारी अजय विटकरे,भाजपा शहराध्यक्ष कैलासराव खाडे,संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष पुरुषोत्तम गडदे,संचालक कांतराव कोटकर,नगरसेवक  अजय विटकरे,प्रभाग क्रमांक 16 च्या नगरसेविका सौ. अनुराधाताई विजय सुतार यांची प्रमुख्याने उपस्थिती होते या विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी मान्यवरांनी शहरातील विकास  कामात नागरिकांनी सहभागी होऊन दर्जेदार कामे करून घेण्याचे आवाहन उपस्थितांना केले तर लोकांनी विकासकामात अडथळा बनू नये यासाठी सर्वांनी शहर विकसित करण्यासाठी समन्वयाची भावना ठेवावी असेही नमूद करण्यात आले या कार्यक्रमासाठी पत्रकार बबन सुतार,अशोक आवारे,समाधान आवचार, विजय सुतार,रवी मानवतकर,गजानन कांबळे,कचरू खडसे, गणपत सुतार,दगडू सुतार, सुदाम गवळी,प्रकाश तनपुरे,सुदाम वाघमारे आदीसह प्रभागातील  नागरिकांसह महिलांची उपस्थिती लक्षणीय होती

No comments:

Post a comment