तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 22 September 2019

परळी मतदार संघाच्या विकासासाठी ना.धनंजय मुंडे यांना साथ द्या-रवि आघाव

 प
रळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- परळी मतदार संघातील जनतेचा सर्वांगिण विकास करण्यासाठी विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनाच साथ द्या असे आवाहन रवि आघाव यांनी केले आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात रवि आघाव यांनी म्हटले आहे की, ना.धनंजय मुंडे यांना परळी मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नासाठी जाणीव आहे. यासाठी गेले अनेक वर्ष ते मतदार संघाच्या विकासासाठी झटत आहेत. अनेक कामे त्यांनी ग्रामिण भागात व शहरी भागात खेचून आणले आहेत. कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च केला आहे. त्यामुळे जनतेच्या विकासाची नाडी ओळखणार्‍या धनंजय मुंडे यांनाच विधानसभेत निवडणु पाठविणे म्हत्वाचे आहे.
जनतेचा कोणताही प्रश्न असो ना.धनंजय मुंडे तो सोडविल्याशिवाय राहत नाहीत. त्यांचे मतदारसंघातील जनतेवर प्रचंड प्रेम आहे. मतदारसंघातील जनतेचा विकास करावायचा असेल तर ना.धनंजय मुंडे यांनाच साथ द्या असे आवानही रवि आघाव यांनी केले आहे.

No comments:

Post a comment