तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 5 September 2019

स्काऊटस्‌ गाईडस्‌च्या राज्यस्तरीय पुरस्कारांचे ८ सप्टेंबर रोजी शालेय शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते वितरण


बाळू राऊत प्रतिनिधी
मुंबई, दि. 5 : महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट गाईड राज्य संस्थेतर्फे येत्या रविवारी ८ सप्टेंबर रोजी दुपारी 2.00 वाजता स्काऊट गाईड पॅव्हेलियन, शिवाजी पार्क, दादर येथे राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण शालेय शिक्षण मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते होणार आहे.
राज्यस्तरीय स्काऊट गाईड चळवळीसाठी जीवनभर सातत्याने काम करणाऱ्या व्यक्तींचा प्रा.टी.पी.महाले जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. बार-टु-मेडल ऑफ-मेरिट आणि राज्य स्काऊट गाईड पुरस्काराचेही वितरण यावेळी होणार आहे.

No comments:

Post a Comment