तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 1 September 2019

सहाय्यक प्रशासन अधिकारी सतिश परळीकर सेवानिवृत्त; पंचायत समितीत निरोप समारंभाचा कार्यक्रमप्रशासनात परळीकरांची मोलांचे योगदान-गटविकास अधिकारी लोखंडे
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः-
        येथील पंचायत समितीचे सहाय्यक प्रशासन अधिकारी सतिश बाबुराव परळीकर हे
31 ऑगस्ट रोजी शासकिय सेवेतुन निवृत्त झाले. त्याबद्दल त्यांचा शनिवारी परळी पंचायत समितीच्या कार्यालयात सत्कार करण्यात आला.
        यावेळी परळी पंचायत समितीचे उपसभापती बालाजी उर्फ पिंटु मुंडे, नागापुरचे सरपंच मोहन सोळंके, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वैजनाथ
लोखंडे, अविनाश लहुरीकर, उत्तम मुंडे व पंचायत समितीचे सर्व कर्मचारी
उपस्थित होते.
        सतिश परळीकर यांनी परळी पंचायत समितीत उल्लेखनिय प्रशासकिय सेवा बजावली आहे. त्यांच्या कामाच्या पध्दतीमुळे प्रशासनात कामकरतांना सर्वांना
मोलाचे सहकार्य मिळाले आहे. असे गौरवउद्गार परळी पंचात समितीचे गटविकास
अधिकारी वैजनाथ लोखंडे यांनी आपल्या मनोगतात बोलतांना काढले. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती बालाजी मुंडे व मोहन सोळंके यांनी सतिश परळीकर यांना शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment