तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 2 September 2019

नाथ प्रतिष्ठानच्या श्रीं ची धनंजय मुंडे, बजरंग सोनवणेंच्या हस्ते प्रतिष्ठापनास्थायी देखाव्याचे ही झाले उद्घाटन

परळी वैजनाथ+प्रतिनिधी) :- दि.02............. नाथ प्रतिष्ठान आयोजित श्री वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सवाच्या श्रीं ची प्रतिष्ठापना आज प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे राष्ट्रवादी कॉंग्रसचे जिल्हाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे यांच्या हस्ते विधीवत पुजा करून करण्यात आली. यावेळी 10 दिवस ठेवल्या जाणार्‍या स्थायी देखाव्याचे उद्घाटन ही करण्यात आले. 

मोंढा मैदानावर श्रीं ची प्रतिष्ठापना कार्यक्रमाच्या वेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस रणजित चाचा लोमटे, कृ.उ.बा. समिती सभापती गोविंद फड, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, गटनेते वाल्मिक अण्णा कराड, उपनगराध्यक्ष अय्युब पठाण, युवक नेते रामेश्‍वर मुंडे, जि.प. सदस्य प्रा.मधुकर आघाव, माजी शहराध्यक्ष चंदुलाल बियाणी, प्रतिष्ठानचे सचिव नितीन कुलकर्णी, शिक्षण सभापती संजय फड, नगरसेवक गोपाळ आंधळे, भाऊसाहेब कराड, महेंद्र रोडे, दिलीप कराड, राजाभाऊ पौळ, शंकर कापसे, अतुल फड, बळीराम नागरगोजे, बालाजी दहिफळे, जयदत्त नरवटे, ज्ञानेश्‍वर होळंबे, आबा गित्ते, सुंदर आंधळे, वैभव कराड आदी उपस्थित होते.

दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर या वर्षी नाथ प्रतिष्ठानच्या महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन न करता साधेपणाने केवळ श्रीं ची प्रतिष्ठापना करण्यात आली असून, 10 दिवस धार्मिक स्थायी देखावा ठेवण्यात आला आहे. याशिवाय ह.भ.प. इंदोरीकर महाराजांचे दि.11 सप्टेंबर रोजी किर्तन आयोजित करण्यात आले असून, त्याचा लाभ घेण्याचे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.


No comments:

Post a comment