तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 6 September 2019

लढा महाराष्ट्राचा आढावा मतदार संघाचाकांदिवली पूर्व विधानसभा संघ
मतदारसंघ क्रमांक – १६०
मतदारसंघ आरक्षण – खुला
विद्यमान आमदार : अतुल भातखळकर, भाजप
पराजित उमेदवार :रमेश ठाकूर, काँग्रेस
मतदारांची संख्या
पुरुष – १,५३,७००
महिला – १,१९,६००
एकूण मतदार – २,७३,३००
कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघ हा मुंबई उत्तर मतदारसंघात मोडतो. मतदारसंघ पुनर्रचना २००८ प्रमाणे हा अस्तित्वात आलेला आहे अनुक्रमाने येणारा मतदारसंघ क्रमांक : 160 आहे. आतापर्यंत या मतदारसंघात दोनच निवडणुका झाल्या. आणि दोन्ही निवडणुका या भाजपाने जिंकल्या आहेत. सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित् भाजपा प्रवक्ते अतुल भातखळकर करीत आहे. २००९ ची निवडणूक या मतदारसंघातील पाहिलीच निवडणूक होती. त्या निवडणुकीत कॉंग्रेसने विजयी मिळवला होता त्याचे कारण मनसे फॅक्टर होता. कॉंग्रेसच्या रमेशसिंघ ठाकूर यांनी भाजपाच्या जयप्रकाश ठाकूर यांचा ११००० मतांनी पराभव केला होता. यांचे कारण मनसेच्या विनोद पवार यांनी २४०९१ मते मिळवली होती. ही सगळी मते मनसेने शिवसेनेची खेचली होती. युती असल्यामुळे भाजपाला मारक ठरली. याशिवाय या निवडणुकीत बसपा, रिपाई, आठवले गट, आणि ७ अपक्ष  होते. बाकी कोणाला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. पण कॉंग्रेस भाजपा आणि मनसे यांनी मते मिळवली होती. 
२०१४ ला मात्र ही परिस्थिती बदलली भाजपाने निर्माण केलेली मोदीलाट, शिवसेना, आणि भाजपा यांच्यातील तुटलेली युती आघाडीची तुटलेली युती यात मनसेची झालेली फरफट झाली. मनसेला कुठेच संधी शिल्लक राहिली नाही. बहुरंगी लढत असूनसुद्धा भाजपाने ही निवडणूक भरघोस मताधिक्याने जिंकली यावेळी मैदानात भाजपा, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, बसपा, शेकाप, बहुजन विकास आघाडी, या पक्षाशिवाय काही अपक्ष रिंगणात होते. भाजपाने दमदार उमेदवार यावेळी दिलेला होता.अतुल भातखळकर यांनी कॉंग्रेसच्या रमेशसिंघ ठाकूर यांचा ४११८८ मतांनी पराभव केला होता त्यावेळी शिवसेनेचे अमोल कीर्तिकर हे तिसरया क्रमांकावर होते. मनसेने प्रथमच उत्तर भारतीय उमेदवार उभा केला होता तो चौथ्या क्रमांकावर होता
विधानसभा निवडणूक २०१४ निकाल
१) अतुल भातखळकर, भाजप – ७२,४२७
२) रमेश ठाकूर, काँग्रेस – ३१,२३९
३) गजानन किर्तीकर, शिवसेना – २३,३८५
४) अखिलेश चौबे, मनसे – १३,२०८
५) श्रीकांत मिश्रा, राष्ट्रवादी काँग्रेस – ३१८९
नोटा – १४९२
मतदानाची टक्केवारी – ५३.८५ %
*संकलन : पत्रकार बाळू राऊत*
*मोबाईल नंबर :7021249770*

No comments:

Post a Comment