तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 22 September 2019

संगमनेर विधानसभा निवडणूक लढविणार-संजय फडअश्वि (प्रतिनिधी) :-  संगमनेर विधानसभा मतदारसंघातुन आपण निवडणूक लढविण्यास इच्छुक असून पक्षश्रेष्ठी आपल्याला निश्चितपणे उमेदवारी देतील असा आत्मविश्वास शासन नियुक्त संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती,जय भगवान महासंघाचे जिल्हा प्रमुख तसेच संगमनेर शिवसेनेचे विधानसभा प्रमुख *संजय फड* यांनी व्यक्त केला आहे.
 याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री.फड यांनी म्हटले आहे की आपण गेल्या 25 वर्षापासून शिवसेनेचे काम करत आहोत ,शिवसेनेचे शहर प्रमुख व इतर पदावर ही आपण काम केले असून तालुक्यातील विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी वेळोवेळी आंदोलने केली आहे.संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये शासनाने आपली संचालक म्हणून निवड केली आहे. या पदाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी आपण लढली आहे.तलुक्यात वंजारी बांधवांची संख्या मोठी आहे संघटनेच्या माध्यमातून समाजाच्या न्याय व हक्कासाठी आपण वेळोवेळी प्रयत्न केले आहेत.
 आपण संगमनेर विधानसभा मतदारसंघातुन निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहे शिवसेना भवन मधे मुलाखतही दिलेली आहे. गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आपण पक्षाकडे उमेदवारी मागत आहोत . या निवडणुकीत पक्ष आपल्याला निश्चितपणे संधी देईल असा आत्मविश्वास,शासन नियुक्त कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेर,जय भगवान महासंघाचे जिल्हाप्रमुख तसेच संगमनेर शिवसेनेचे विधानसभा प्रमुख संजय फड यांनी व्यक्त केला आहे.

No comments:

Post a comment