तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 1 September 2019

आज महत्त्वपुर्ण कार्यकर्त्याची गेवराईच्या विश्रामगृहावर बैठक

सुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. १ _ तालुक्यातील सर्व दलित सामाजिक संघटना विविध पक्ष, सामाजिक कार्यकर्ते, कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांंची बैठक दिनांक आज शनिवार, दि. १ सप्टेंबर रोजी दुपारी १२ :३० वाजता शासकिय विश्रागृह गेवराई येथे आयोजित केलेली आहे. या बैठकीस गेवराई तालुक्यातील सर्व संघटना पदाधिकारी व विविध पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन विश्वनाथ शरणांगत यांनी केले आहे.
           प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि, दलित समाजावर आत्याचार वाढत आहे. सरकारी नौकरीत अनेक जागा असुनही भरल्या जात नाहीत, यामुळे समाजामध्ये सुशिक्षित बेरोजगारीची संख्या वाढत आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नाही, अनेक शैक्षणिक अडचणी असल्यामुळे शिक्षणाचे प्रमाण कमी होत चालले आहे. सरकारी उद्योग धंद्याचे खाजगीकरण करून आरक्षण संपवली जात आहे तसेच गेवराई तालुक्यात दलित समाजाची एकजुट नसल्यामुळे दबाव राहिलेला नाही.
खेडेगातील दबावतंत्र हटविण्यासाठी सर्वांनी या बैठकीस हजर रहावे आदी प्रमुख प्रश्नांंसह गेवराई तालुक्यातील इतर प्रश्नावर चर्चा करण्यासाठी तसेच गेवराई तालुक्यातील विविध राजकिय पक्षावर आंबेडकरी चळवळीचा दबाव राहिला नाही कारण कार्यकर्त्यांत एकजुट व एक वाक्याता नाही. 
       या सर्व बाबीचा विचारविनिमय करण्यासाठी गेवराई तालुक्यातील सर्व राजकिय पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संघटनांंचे कार्यकर्ते, कर्मचारी वर्ग, सेवानिवृत कर्मचारी व जेष्ठ मार्गदर्शक यांची बैठक आयोजित केलेली आहे. राजक्रिय मतभेद विसरून समाज हितासाठी व चळवळीला गतिमान करण्यासाठी या बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन विश्वनाथ शरणांगत यांनी केले.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment