तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 13 September 2019

गेवराई विधानसभा मतदार संघातून लताताई पंडितांचे नाव अग्रक्रमावर
सुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. १३ _ प्रहार जनशक्षाच्या वतीने पिडीत, अत्याचारीत महिलांना न्याय देणे करीता लताताई पंडित या गेवराई विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती निवेदनाद्वारे देण्यात आली आहे. परिणामी सबंध गेवराई विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने 'पंडित' या आडनावावर शिक्कामोर्तब झाल्याने चर्चेला उधान आले आहे.
         गेवराई येथे प्रहार जनशक्ती या पक्षामध्ये काम करणाऱ्या महिला व पुरुष या सर्वांची बैठक झाली, बैठकीमध्ये चर्चेचा विषय म्हणजे मागील ४ ते ५ वर्षापासुन गेवराई तालुक्यातील महिलांंवर मोठया प्रमाणावर अन्याय, अत्याचार होत आहेत. शासन दरबारी देखील महिलांंचे कामे होत नाहीत. तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अंध व अपंगाना प्रमाणपत्र नसल्याने शासनाच्या अनेक योजनेपासुन त्यांना वंचित रहावे लागले आहे. पिडीत, विधवा, शेतमजुर, घरगुत्ती भांडे, धुने धुणारी आदी महिलांंना राहण्याकरीता घर नाही अशा अनेक गरजु महिलांना शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्या या योजनेपासुन वंचित राहीलेले आहेत. काही महिलांना तहसिल कार्यालया मार्फत राशन कार्ड देखील मिळालेले नाहीत. संजय गांधी, श्रावण बाळ योजने संदर्भात तहसिलमध्ये झालेल्या बैठकीत ११ हजार च्या वर लाभधारकांना तहसिल कार्यालयाने लाभधारकांना मंजुरी पत्र दिलेले आहेत, परंतु १ वर्षाच्या अधिक कालावधी झालेला आहे. संजय गांधी श्रावण बाळ योजनेच्या खात्यावर तहसिल कार्यालया मार्फत आज पर्यंत अनुदान पाठवण्यात आलेले नाही. गरीब लाभधारकांच्या खात्यावर अनुदान पाठवण्या करीता दरम्यान तहसिल कार्यालयावर मोर्चा देखील काढण्यात आला होता. त्या करिता कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठकीत गेवराई विधान सभेची २०१९ मध्ये होणारी निवडणुक प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने निवडणुक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला.
       त्या बैठकीमध्ये महिला आघाडी गेवराई या पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष लताताई सिताराम पंडित यांनी ही निवडणुक लढावी म्हणुन निर्णय घेण्यात आलेला आहे. याकरिता लताबाई पंडित यांनी महिलावरील अन्याय, अत्याचार रोखण्याच्या उद्देशाने व शेतकऱ्यांच्या प्रश्नांकरीता गेवराई विधानसभेची निवडणुक लढविणार आहे. परिणामी सबंध गेवराई विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने 'पंडित' या आडनावावर शिक्कामोर्तब झाल्याने चर्चेला उधान आले आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment