तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 5 September 2019

बाप्पांच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री फडणवीस, उत्तर प्रदेशचे उप मुख्यमंत्री मोर्य यांचेसह दिग्गजांची 'राॅयलस्टोन' वर हजेरी


ना. पंकजाताई मुंडे यांनी केले सर्वांचे स्वागत

मुंबई (प्रतिनिधी) :-  दि. ०५ ------ राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या 'राॅयलस्टोन' निवासस्थानी बाप्पांच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे उप मुख्यमंत्री मोर्य, जपानचे कौन्सिलेट जनरल हराडा यांचेसह अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. ना. पंकजाताई मुंडे व खासदार डाॅ प्रितमताई मुंडे यांनी यांनी या सर्वांचे स्वागत केले. 

   प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही राॅयलस्टोन या शासकीय निवासस्थानी 'श्री' चे थाटात आगमन झाले. ना. पंकजाताई मुंडे व डाॅ. अमित पालवे यांनी गणेश चतुर्थीला 'श्रीं' ची विधीवत पूजा करून प्रतिष्ठापना केली. गेल्या दोन दिवसांत बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी राज्यातील अनेक नेते, आजी-माजी आमदार, मंत्री व विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी हजेरी लावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, उत्तर प्रदेशचे उप मुख्यमंत्री केशवप्रसाद मोर्य, जपानचे कौन्सिलेट जनरल मिशिओ हराडा, भाजपचे महाराष्ट्र प्रभारी खासदार भूपेंद्र यादव, सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, संघटनमंत्री व्ही. सतीश, राज्याचे मुख्य सचिव अजाॅय मेहता, प्रधान सचिव भूषण गगराणी आदींसह अनेकांनी राॅयलस्टोनच्या बाप्पांचे दर्शन घेतले.

No comments:

Post a Comment