तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 6 September 2019

लढा महाराष्ट्राचा आढावा मतदारसंघाचा विक्रोळी विधानसभा

 म. क्र. १५६, मतदारसंघ आरक्षण – खुला
विद्यमान आमदार – सुनील राऊत, शिवसेना  ५०, ३०२
पराभूत उमेदवार - मंगेश सांगळे, मनसे – २४,९६३
मतदारांची संख्या
पुरुष – १,३६,९९२
महिला – १,१७,८३८
एकूण मतदार – २,५४,८३०
विक्रोळी (विधानसभा क्र. १५६) हा ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात मोडतो. या मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर  सुनील राऊत २०१४मध्ये पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून गेले आहेत त्यांनी निवडणुकीच्या राजकारणात अनुभव नसताना देखील मनसे चे मंगेश सांगळे यांचा पराभव केला आहे. या अगोदर मनसे चे मंगेश सांगळे आमदार होते परंतु आता ते भाजपा वाशी झाले आहेत भाजप-शिवसेना स्वतंत्र जरी लढले असले, तरी मोदी लाटेचा फायदा शिवसेनेला देखील झालाच. संजय राऊत यांचे बंधू असलेल्या सुनील राऊत यांनी २०१९च्या लोकसभा निवडणुकांवेळी किरीट सोमय्यांना उमेदवारी दिली, तर बंडखोरी करण्याचा इशारा दिला होता.
विक्रोळी विधानसभा मतदारसंघ
विक्रोळी मतदारसंघात मराठी मताचा टक्का जास्त आहे. तसेच तिथे शेजारीच असणाऱ्या डम्पिंग ग्राऊंड आणि अस्वच्छता यामुळे विक्रोळी मतदारसंघात आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा बनला आहे. तसेच, ट्रान्झिट कॅम्पमधल्या रहिवाशांच्या पुनर्वसनाचा मुद्दाही कित्येक वर्षांपासून प्रलंबितच आहे. या मूलभूत समस्यांची मागणी एकीकडे असताना दुसरीकडे इथल्या मतदारांमध्ये दलित मतदारांचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळे उमेदवार निवडीमध्ये पक्षांकडून हा घटक नेहमीच विचारात घेतला जातो. २००९च्या राज ठाकरेंच्या सभांचा परिणाम म्हणून मनसेचे उमेदवार मंगेश सांगळे यांनी मठा विजय मिळवला होता. मात्र, २०१४मध्ये मोदी लाटेसमोर त्यांचा तब्बल ३४ हजार मतांनी पराभव झाला. या मतदारसंघात एकूण २५२ मतदान केंद्र आहेत.
१) सुनील राऊत, शिवसेना – ५०,३०२
२) मंगेश सांगळे, मनसे – २४,९६३
३) संजय दीना पाटील, राष्ट्रवादी – २०,२३३
४) संदेश म्हात्रे, काँग्रेस – १८,०४६
५) विवेक पंडित, रिपाइं – ६९७५
नोटा – ३२५१
मतदानाची टक्केवारी – ५१.६२ %
संकलन :बाळू राऊत
मोबाईल नंबर :7021249770

No comments:

Post a Comment