तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 5 September 2019

गंगाखेड विधानसभास्तरीय आदर्श गौरी - गणेश मंडळ स्पर्धेचे आयोजनमानाच्या पैठणीसह चषक देवून होणार गौरव 


अरुणा शर्मा

पालम : गंगाखेड, पालम आणि पुर्णा तालुक्यांतील सार्वजनीक गणेश मंडळे, घरगूती गणपती सजावट आणि गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सव आणि घरगूती सजावटीतून सामाजीक संदेश देणारी सार्वजनीक मंडळे आणि कुटूंब प्रमुख, गृहीणींचा मान्यवरांच्या हस्ते गौरव केला जाणार आहे. या ऊपक्रमात तीन्ही तालुक्यांतील जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन संयोजक तथा साईसेवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष गोविंद यादव यांच्या वतीने करण्यात आले आहे. 

गंगाखेड विधानसभा पातळीवर ही स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे. प्रथम येणाऱ्या सार्वजनीक गणेश मंडळ आणि घरगूती गणपती सजावटीस चषक देवून गौरविले जाईल. लॉयन्स क्लब जनाईचे अध्यक्ष संतोष तापडिया यांच्या वतीने हे चषक दिले जातील. तर तीन्ही तालुक्यांतून सर्वप्रथम येणाऱ्या गौरी ( महालक्ष्मी ) सजावटीस मानाची पैठणी भेट दिली जाणार आहे. तसेच गंगाखेड, पालम आणि पुर्णा या तालु्क्यांतून प्रत्येकी एका यशस्वी स्पर्धकास पैठणीची भेट दिली जाईल. तर द्वितीय आणि तृतीय यशस्वी स्पर्धकास साडी-चोळीची भेट दिली जाईल. गंगाखेड येथील प्रसिद्ध कापड व्यापारी रामचंद्र रंगनाथ रेवणवार यांच्या वतीने ही बक्षीसे दिली जाणार आहेत. 

गणेशोत्सव आणि गौरी सजावटीतून सामाजीक संदेश दिले जावेत. या ऊत्सवांचा ऊपयोग समाज हितासाठी व्हावा, हाच या स्पर्धेमागचा मुख्य ऊद्देश असल्याची माहीती संयोजक गोविंद यादव यांनी दिली आहे. सार्वजनीक गणेशोत्सव शांततेत आणि ऊत्साहात व्हावा यासाठी गंगाखेडचे तहसील, पोलीस आणि नगर परिषद प्रशासन सार्वजनिक गणेश मंडळ स्पर्धा संयोजनाचे सहाय्यक असणार आहेत. तर घरगूती स्पर्धेसाठी लॉयन्स क्लब जनाई, सवंगडी कट्टा समुह, योगेश्वरी महिला बचत गट आणि गौरी महिला बचत गट या संस्था माध्यम संयोजक म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. स्पर्धेत सहभागासाठी नोंदणी आवश्यक असून नोंदणी आणि अधिक माहितीसाठी गोविंद यादव ( 942154 1111 ), सखाराम बोबडे ( 95119 22000 ) यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन सर्वश्री सुशांतभैय्या चौधरी, नागेश पैठणकर, रमेश औसेकर, नंदकुमार भरड, कल्याण तुपकर, गजानन महाजन, सुहास देशमाने, कारभारी निरस, किरण जोशी, मनोज नाव्हेकर, कल्याण तुपकर, ॲड पंकज भंडारी, दिलीप सोळंके, हरिभाऊ सावरे, राजेंद्र पाठक, कृष्णा पदमवार, बंडू वडवळकर, प्रशांत गुंडाळे, नरेंद्र नळदकर, बाळासाहेब सोनटक्के, बालासाहेब यादव, सुहास देशमाने आदिंसह संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment