तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 2 September 2019

परळीत तीन्ही पोलीस ठाण्याच्या मधोमध एकचा मृतदेह;खुनाचा संशय
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
परळी शहरातील गणेशपार भागातील युवक अनिल बसवेश्वर हालगे या युवकाचा मृतदेह परळी शहर,संभाजीनगर व ग्रामीण पोलिस ठाण्याच्या मधोमध असलेल्या मुस्लीम स्मशानभूमीत आज दि.02 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वा. आढळून आला.मृतदेहाच्या अंगावर अनेक वार असल्याने हा प्रकार खुनाचा असल्याचे बोलले जात आहे.या घटनेमुळे परळी शहरात खळबळ उडाली आहे.
 मुस्लीम स्मशानभूमीत आज सकाळी 22 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आल्याची बातमी पसरली.गणेशपार भागातील अनिल बसवेश्वर हालगे हा काल रात्री 8 वा.लातुरला जाण्यासाठी घरातुन निघाला तो लातुरला पोंहचला नसल्याचे लक्षात आल्यानंतर नातलगांनी घटनास्थळ गाठले व तो मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले.मृतदेहावर पाच वार असुन बाहेर कुठेतरी खुन करुन मृतदेह कब्रस्थानमध्ये आणुन टाकण्याचा अंदाज असुन तो चार ते पाच जणांनी केला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे.परळी शहर,संभाजीनगर व ग्रामीण पोलिस ठाण्याच्या मधोमध व हाकेच्या अंतरावर ही घटना घडल्याने कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत.दोन दिवसांपूर्वीच जिल्हा पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी शांतता कमेटीचे बैठक घेवुन शहरातील घटनासंदर्भात सीसीटिव्हीची मदत घेवुन गुन्हे दाखल केले जातील असे सांगुन पोलिस यंत्रणा सज्ज असल्याचे सांगीतले होते.ही घटना घडली त्याच्या 100 फुटांवर बसवेश्वर चौकात सीसीटिव्ही यंत्रणा कार्यान्वित आहे.परळी शहर पोलिसांची शहरात रात्रीची गस्त असताना पोलिस ठाण्याच्या इमारतीस लगत घडलेल्या या घटनेने परळी शहर पोलिस ठाण्याच्या कारभाराचे वाभाडे निघाले आहेत.

No comments:

Post a Comment