तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 7 September 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत औरंगाबादेत आज राज्यस्तरीय सक्षम महिला मेळावाना.पंकजाताई मुंडे यांनी मेळाव्याच्या जय्यत तयारीचा घेतला आढावा ; बचतगटांच्या स्टाॅललाही दिली भेट

महिलांच्या सक्षमीकरणासाठी नव्हे तर सक्षम महिलांचा मेळावा - ना. पंकजाताई मुंडे यांची पत्रकार परिषद  

औरंगाबाद (प्रतिनिधी) :- दि. ०६ ------ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या  प्रमुख उपस्थितीत उद्या (ता. ०७) शनिवारी औरंगाबाद येथे ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या वतीने महिला बचतगटांच्या "सक्षम महिला मेळावा" चं भव्य आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याची जबाबदारी राज्याच्या  ग्रामविकास व महिला बालविकास मंत्री ना. पंकजाताई  मुंडे यांच्या खात्याकडे आहे,त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते आज दिवसभर त्यांनी स्वत: तयारीचा आढावा घेतला. या मेळाव्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्वतः ना. पंकजाताई मुंडे महिलांना संबोधित करणार आहेत.

   हा मेळावा म्हणजे महिलांच्या सक्षमीकरणासाठी नसून सक्षम महिलांचा मेळावा असल्याची महिती ना. पंकजाताई मुंडे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.  उद्योग राज्यमंत्री अतुल सावे, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ.भागवत कराड, उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला, यांच्यासह इतर संबंधित मान्यवर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

  उमेद अभियानांतर्गत राज्यात ४ लक्ष ८ हजार स्वयंसहाय्यता गटांची स्थापना करण्यात आली असून राज्यातील ४३  लक्ष ५८ हजार गरीब कुटुंबांना अभियानात समाविष्ट करण्यात आलेले आहे. अभियानातंर्गत रु.५२४ कोटी ८५ लाख एवढा समुदाय निधी तर ५ हजार २४९ कोटी ५० लाख रूपये बँक कर्ज स्वयं सहाय्यता गटांना उपलब्ध करुन देण्यात आला आहे. राज्यात ३१ हजार प्रशिक्षित समुदाय संसाधन व्यक्ती कार्यरत असून त्यांच्या माध्यमातून गटांना नियमित मार्गदर्शन करण्यात येत आहे. 

या अभियानांतर्गत प्रयत्नांमुळे ग्रामीण महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यास तसेच गटांमध्ये समाविष्ट महिलांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण व संपूर्ण कुटुंबांसाठी आरोग्य सुविधा मिळण्यासाठी सुलभीकरणाचे काम करण्यात येत आहे.स्वयं सहायता गटातील महिलांना शाश्वत शेती, भाजीपाला लागवड, फलोत्पादन, शेळीपालन, तळ्यातील मासेमारी परसातील कुक्कुटपालन यासारखे व उपजिविका स्त्रोत ७ लक्ष ५० हजार कुटुंबांना शाश्वत उपजीविकेचे स्त्रोत उपलब्ध करुन देण्यात आले असुन त्या माध्यमातून  ७१३ कोटी १६ ल
लाख रूपये उत्पन्न निर्माण झाले असल्याची माहिती ना. पंकजाताई मुंडे यांनी यावेळी दिली. पत्रकार परिषदेनंतर ना. पंकजाताई मुंडे यांनी सभा स्थळाची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला तसेच बचतगटांच्या स्टाॅललाही भेट दिली, यामुळे तेथील महिलांचा उत्साह वाढला.

No comments:

Post a comment