तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 1 September 2019

परळी फेस्टिवलच्या श्री गणरायाची प्रा .टी.पी. मुंडे यांच्या हस्ते सोमवारी प्रतिष्ठापना
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 

गेल्या 22 वर्षांपासून अविरत चालू असलेला परळी फेस्टिवल च्या श्री गणरायाची प्रतिष्ठापना उद्या सोमवार रोजी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा  परळी फेस्टिवलचे  संस्थापक  मुख्य मार्गदर्शक  प्रा  टी पी मुंडे सर  यांच्या हस्ते होणार आहे


     गेल्या 22 वर्षांपासून पुणे फेस्टिव्हलच्या धरतीवर अविरत चालू असलेला परळी फेस्टिवल मध्ये अनेक सांस्कृतिक मनोरंजनात्मक प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले जातात परंतु यावर्षी दुष्काळाची भयानक दाहकता लक्षात घेता परळी फेस्टिवल मधील सर्व सांस्कृतिक मनोरंजनात्मक प्रबोधनात्मक कार्यक्रम यावर्षी रद्द करण्याचा निर्णय परळी फेस्टिवल च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे मात्र दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी श्री गणरायाची मूर्तीची प्रतिष्ठापना विधिवत पद्धतीने पूजा करून करण्यात येणार आहे उद्या सोमवार रोजी परळी फेस्टिवल च्या श्री श्री गणरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा परळी फेस्टिवलचे मुख्य मार्गदर्शक संस्थापक प्रा टी पी मुंडे सर यांच्या शुभ हस्ते सायंकाळी 5:00  वा. जवाहरलाल  नेहरू  महाविद्यालयात संपन्न होणार आहे तरी सर्व नागरिकांनी ,युवकांनी ,तसेच परळी फेस्टिवलच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन परळी फेस्टिवल चे अध्यक्ष प्रा विजय मुंडे यांनी केलेे आहे.

No comments:

Post a Comment