तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 7 September 2019

ऊसतोडणी कामगार महिलांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी तहसिल कार्यालयावर मोर्चामोर्च्यात मोठ्या संखेने सहभागी होण्याचे कॉ सय्यद रज्जाक यांचे आव्हान.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
गर्भाशयाचे ऑपरेशन करून पिशवी काढून टाकलेल्या ऊसतोडणी कामगार महिलांना नुकसान भरपाई द्यावी,अशा महिलांना अपंग प्रमाणपत्र देण्यात यावे,पिशवी काढलेल्या महिलांना काम होत नसल्याने त्यांना दरमहा तिन हजार रुपये पेन्शन द्यावी.ई मागण्यासाठी महाराष्ट्र उसतोड़नी व वाहतूक कामगार संघटनेच्या वतीने दि 9 सप्टेंबर सोमवार रोजी परळी तहसिल कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हा सचिव कॉ सय्यद रज्जाक यांनी प्रसिधिपत्रका दुवारे दिली आहे..
प्रसिधिपत्रकात पुढे म्हंटले आहे की,ऊसतोडणी कामगार महिलां पैकी अनेक जणींच्या गर्भाशयाच्या पिशवी चे गरज नसतानाही ऑपरेशन झाल्याचे आता उघड झाले आहे.अत्यंत असुरक्षित व अस्वच्छ परिस्थितीत काम करावे लागत असल्याने आरोग्याच्या अनेक समस्या ऊसतोडणी कामगार महिलांना भेडसावतात. गर्भाशयाचे आजार यातूनच उद्भवतात.कामाच्या ठिकाणी अनेक वेळा दवा पाण्याची सोय नसते. स्वच्छ पाणी, स्वच्छतागृहे, सुरक्षित अडोसा मिळणे मुश्कील असते.
काम सोडून दवाखान्यात जायचे तर अर्थिक झळ सोसावी लागते. अंगावर अजार काढण्याचे प्रमाण ऊसतोडणी कामगार महिलांमध्ये जास्त आहे. त्यामुळे आजार गंभीर स्वरूप धारण करतात.गर्भाशयाचे ऑपरेशन करून पिशवी काढून टाकलेल्या ऊसतोडणी कामगार महिलांना नुकसान भरपाई द्यावी,अशा महिलांना अपंग प्रमाणपत्र देण्यात यावे.
पिशवी काढलेल्या महिलांना काम होत नसल्याने त्यांना दरमहा तिन हजार रुपये पेन्शन द्यावी.
ऊसतोडणी चे दर चाळीस टक्क्यांनी वाढवणारा नविन करार करावा,ऊसतोडणी कामगारांच्या कल्याणकारी मंडळासाठी शासनाने अर्थिक तरतूद करून सामाजिक सुरक्षा योजनेची अंमलबजावणी सुरू करावी. 
ई मागण्यांसाठी शेतमजूर युनियन व सिटू सलग्न महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेच्या वतीने परळी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
या मोर्च्यात ऊसतोडणी कामगार महिलां पुरुषांनी मोठ्या संखेने सहभागी व्हावे असे आवाहन कॉ दत्ता डाके,कॉ सय्यद रज्जाक,कॉ सुदाम शिंदे,सखाराम शिंदे,पंडित शिंदे,आनासाहेब खड़के,विशाल देशमुख,विष्णु पोटभरे,भगवान बडे,यांचा सह आदिने केले आहे.

No comments:

Post a comment