तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 7 September 2019

लढा महाराष्ट्राचा आढावा मतदारसंघाचा अंधेरी पश्चिम मतदारसंघबाळू राऊत प्रतिनीधी 
 मतदारसंघ क्रमांक – १६५, मतदारसंघ आरक्षण – खुला
विद्यमान आमदार – अमित साटम, भाजप
मतदारांची संख्या
पुरुष – १,६५,२३७, महिला – १,४४,५३५, एकूण मतदार – ३,०९,७७२
विधानसभा निवडणूक २०१४ निकाल
१) अमित साटम, भाजप – ५९,०२२
२) अशोक जाधव, काँग्रेस – ३४,९८२
३) जयवंत परब, शिवसेना – २६,७२१
४) रईस लष्करीया, मनसे – १२,९७०
५) एम. ए. हुसेन, एमआयएम – ३८२१
नोटा – १४६७
मतदानाची टक्केवारी – ४६.३९ %
अंधेरी पश्चिम मतदारसं हा उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात मोडतो. 2009 च्या निवडणुकीत या मतदारसंघातून कॉँग्रेसचे अशोक जाधव येथून निवडून गेले होते त्यांनी विष्णु कोरेगांकर यांचा 32158 मतांनी विजयी झाले. या मतदारसंघातून मनसे उमेदवार रईस लष्करीया यांनी देखील चांगले मते मिळाली होती. 
अंधेरी या संमिश्र लोकसंख्या असलेल्या उपनगराचा अंधेरी पश्चिम हा एक मतदारसंघ आहे. मात्र, या भागतल्या सेवा कंपन्या आणि मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्गीय राहणीमानामुळे नागरी समस्यांचा मुद्दा इथे महत्त्वाचा ठरतो. तसेत, अंधेरी एमआयडीसी आणि त्यातून होणारं प्रदूषण हा मुद्दा देखील इथे चर्चेचा असतो. काँग्रेसच्या ताब्यात असणारा हा मतदारसंघ २०१४मध्ये भाजपच्या ताब्यात आला आणि अमित साटम इथले आमदार झाले. या मतदारसंघात एकूण ३०९ मतदान केंद्र आहेत.
मुंबई भाजपमधलं एक तरूण नेतृत्व असलेले अमित साटम २००० सालापासून भाजपसाठी कार्यरत आहेत. भाजयुमोचं देखील त्यांनी प्रतिनिधित्व केलं आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून देखील त्यांनी काम केलं आहे. मुंबई भाजयुमोचं अध्यक्षपद भूषवल्यानंतर २०१२मध्ये मुंबई महानगर पालिकेत नगरसेवक म्हणून ते निवडून गेले. २०१४मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे विद्यमान आमदार अशोक जाधव यांचा तब्बल २५ हजारांहून जास्त मताधिक्याने पराभव केला आणि त्यांचं नाव चांगलंच चर्चेत आलं.

No comments:

Post a Comment