तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 4 September 2019

जि प प्रा शा चिखली येथे रक्तदान शिबिर संपन्न


बदनापूर प्रतिनिधी
आज दिनांक 4 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त जि प प्रा शाळा चिखली ता. बदनापुर येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. विविध शाळेवर आयोजित करण्यात आलेले बदनापूर आणि भोकरदन तालुक्यातील विविध शाळेवर हे सतरावे शिबिर होते. शाळेतील लहान मुलांसमोर रक्तदान करून त्यांच्यातील रक्ताची भीती व गैरसमज दूर व्हावा आणि भविष्यात लहान मुलेही रक्तदानासाठी प्रवृत्त व्हावे हा शाळेवर रक्तदान आयोजित करण्याचा मुख्य हेतू होता. यावेळी 40 रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावले. प्रमुख उपस्थिती मध्ये जी प सदस्य श्री डोळस सर  बदनापूर चे गटशिक्षणाधिकारी श्री कडेलवार साहेब शिक्षण विस्ताराधिकारी जनबंधू साहेब, केंद्रप्रमुख ढाकणे सर, , शिक्षक नेते श्री झुंबड सर, बांदल सर, मंगेश जैवाळ सर, सचिन देशमुख सर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य  ग्रामपंचायत सरपंच व सदस्य  प्रतिष्ठित ग्रामस्थ यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री पांडे सर, श्री महेश देशमुख, श्री बांदल  सर, श्री जुंबड आर आर, श्री वैष्णव सर श्री मनोहर निकम,राऊत सर,सिद्धेश शेळके(co-ordinator), रुपदे सर देशमुख सर तायडे सर सोनटक्के मॅडम चौधरी मॅडम व ग्रामस्थ, सर्व शिक्षक वृंद चिखली केंद्र यांनी परिश्रम घेतले. सदरील शिबिराचे नियोजन करणे व त्यासाठी दत्ताजी भाले रक्तपेढी ची उपलब्धता आम्ही या वर्षीच लोकसहभाग , प्राज फौंडेशन व सावित्रीबाई फुले एकात्म महीला समाज मंडळ या संस्थे सोबत केलेल्या कामाच्या परिचयातून सावित्रीबाई फुले संस्थेचे सहकार्य लाभले.
**उपसरपंच आबासाहेब निकम यानी केले सपत्नीक रक्तदान**

सदरील शिबिरात उपसरपंच श्री आबासाहेब निकम यांच्या  सुविद्य पत्नी सौ आर्चनाताई आबासाहेब निकम यानी प्रथमच रक्तदान करून एक आदर्श घालून दिला त्याबद्दल त्यांचे विशेष कौतूक होत आहे 
तेजन्यूज हेडलाईने प्रतिनिधी अंकुश कदम 8390515197

No comments:

Post a Comment