तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 5 September 2019

अभिनवविद्यालयात शिक्षक दिन साजरा राष्ट्रहितासाठी भविष्याचा वेध घेणारे शिक्षकच असतात - प्रताप मूढेंपरळी वैजनाथ (प्रतिनीधी) :- 
    ज्ञान प्रबोधिनी विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अभिनव विद्यालय नेहरू चौक परळी वैजनाथ येथे 5 सप्टेंबर म्हणजेच भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून संस्थेचे अध्यक्ष राजेभाऊ जबदे व संस्थेचे सचिव परळी भूषण साहेबराव फड यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक प्रताप मूंढे व प्रमुख अतिथी म्हणून सहशिक्षक सचिन सोमवंशी व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक वर्ग नववीतील हर्ष मिश्रा यांनी केले तसेच वर्ग नववीतील विद्यार्थ्यांनी  शिक्षक दिनानिमित्त तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे अनावरण  मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेतील सर्व शिक्षकांचे पुष्पगुच्छ देवून कृतज्ञा व्यक्त केली. शाळेतील विद्यार्थ्यांनी साक्षी जगताप ,पियुष आगलावे, जय माने ,ओमकार शिंदे , राजश्री गुट्टे ,ओम गायकवाड, अनुष्का सोनवणे यांनी शिक्षका प्रति आपल्या भावना व्यक्त केल्या नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी शिक्षक दिना बद्दल मार्गदर्शन केले भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा 5 सप्टेंबर रोजी जन्मदिन 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. 'शिक्षक' हा भावी पिढी असलेले प्रेम व आदर पाहून भारत सरकारने त्यांचा जन्मदिन हा 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करण्‍याचा संकल्प केला असे प्रतिपादन प्रताप मुंढे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी वैष्णवी तोरडमल हिने केले तर उपस्थितांचे आभार कुमारी प्रतीक्षा भोसले हिन व्यक्त केले या कार्यक्रमास सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.


No comments:

Post a comment