तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 4 September 2019

अभिनव विद्यालयात अभिनव गणपती फेस्टिवल अंतर्गत रांगोळी व रंगभरण स्पर्धा संपन्न
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
    ज्ञानप्रबोधनी विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अभिनव प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे संस्थेचे अध्यक्ष राजेभाऊ जबदे व सचिव परळी भूषण साहेबराव फड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिवर्षीप्रमाणे अभिनव गणपती फेस्टिवलचे आयोजन करण्यात आलेले आहे. या अंतर्गत आज शाळेमध्ये प्राथमिक विभागाची रांगोळी व चित्रकला रंग भरणा ही स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेच्या कोषाध्यक्षा अंजलीताई फड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या काढून उपस्थितांची मने जिंकली. इयत्ता पहिली ते तिसरी च्या विद्यार्थ्यांनी रंगभरण या स्पर्धेमध्ये उत्कृष्टरित्या सहभाग घेऊन दिलेल्या चित्रांमध्ये रंग भरून आयुष्यातले रंगाचे महत्व त्याठिकाणी विशद केले. स्पर्धेच्या उद्घाटक अंजलीताई फड यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देऊन या महोत्सवाचे महत्त्व विशद करून अभिनव विद्यालय हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ते बरोबरच सांस्कृतिक कलागुणांना वाव देणारे तालुक्यातील एकमेव शाळा आहे असे गौरवोद्गार काढले. या स्पर्धेचे परीक्षण सहशिक्षिका मीरा ताटे व सीता शिंदे यांनी केले ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment