तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 30 September 2019

मेहेरगाव येथील ग्रामपंचायतीत भोंगळ कारभार


धुळे जिल्हा : धुळे तालुक्यातील मेहेरगाव येथील ग्रामपंचायतीत भोंगळ कारभार सुरू आहे. ह्याची नोंद मिळताच सोनवणे ह्यांनी भेट दिली असता सरपंच व ग्रामसेवक ह्यांचे पितळ उघडे झाले सकाळी भेट दिली असता सदर ग्रामपंचायत बंद दिसून आली आठवड्याचा पहिला वार ग्रामस्थना लागणाऱ्या सोयी सुविधा पुरविण्यास अत्यंत धिरंगाई दिसून आली सदर शिपाई ह्यास दालन उघडण्यास सांगितल्यावर त्यानी दालन उघडले आणि सोनवणे बाहेर येताच दालन बंद करून लगेच शिपाई निघून गेले. सदर सरपंच ह्यांना कॉल केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली व दालनात उपस्थित राहिले नाहीत. सदर गावात घरकुल योजनेत मोठा घोटाळा आढळून आला आहे ज्यांना गरज आहे त्यांना घरकुल मंजूर झालेली नाहीत आणि  ज्यांना गरज नाही त्यांना दोन दोन घरकुल मंजूर करण्यात आले आहेत ही बाब नागरिकानि निदर्शनास आणून दिली. सदर आदिवासी वस्तीत योग्य सुविधा उपलब्द नसून तेथील विकासासाठी आलेला पैसे देखील सरपंच व ग्रामसेवक ह्यांनी खाल्ले असल्याचा आरोप नागरिकांनी केला सदर वस्तीत गेले असता असे निदर्शनास आले की सरकारी योजना व रस्ते निधी देखील सरपंच व ग्रामसेवक ह्यांनी गडप केला असून नागरी सुविधा एकही उपलब्द नाही. विहीर मंजूर योजने मध्ये देखील भ्रष्टाचार दिसून आला प्रत्येक्ष नागरीकांनी ही बाब लक्षात आणून दिली मंजूर झालेल्या विहिरी अचानक गायब झाल्याचे चित्र दिसून आले मंजुर झालेले घरकुल देखील आदिवासी लोकांना मिळाले नाही इतका मोठा भ्रष्टाचार असून सरपंच ग्रामसेवक हे मजा करताना दिसून आले ह्या संबधी सर्व पुरावे उपलब्द असून लवकरच ते ही उघडे केले जाईल असे सोनवणे ह्यांनी ह्यावेळी सांगितले. सदर ग्रामपंचायत मध्ये महिला सरपंच असून त्यांचे पती प्रभाकर भामरे हे कारभार बघताना दिसून आले सदर गावात एकदाही सरपंच ह्यांनी भेट दिली नसून त्यांचे पती स्वतः एक ग्रामसेवक असताना ते गावातील कारभार स्वतः बघत असल्याचे निदर्शनास आले. गावात एकही ग्रामसभा घेण्यात आलेली नसून गावातील ठराव स्वतः सरपंच व ग्रामसेवक हे पास करून घेत असल्याचा आरोप ह्यावेळी ग्रामस्थांनी केला ह्या बाबत सर्व पुरावे उपलब्ध असून सरपंच किंवा पदाधिकारी ह्यांनी एकही कॉल घेतला नाही एक पदाधिकारी ग्रामपंचायत मध्ये माहिती घेण्यासाठी आले असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. याबत खुलासा न झाल्यास सर्व पुरावे महाराष्ट्र मधील प्रमुख चॅनेल्स वर दाखवण्यात येतील असेही सोनवणे ह्यांनी सांगितले आहेत

No comments:

Post a Comment