तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 25 September 2019

कोलूघाणा सेवा सोसायटीच्या संचालकपदी संगमेश्वर फुटके यांची निवडपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
          येथील कोलूघाणा सोसायटीच्या संचालकपदी संगमेश्वर फुटके यांची निवड करण्यात आली. याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
            शहरातील मार्केट परिसरात असलेली कोलूघाणा सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. या सर्वसाधारण सभेत संस्थेचा वार्षिक आढावा सभासदांसमोर मांडण्यात आला. यावेळी संगमेश्वर फुटके यांची संचालक म्हणून निवड करण्यात आली. या वार्षिक सर्वसाधारण सभेस संस्थेचे अध्यक्ष सुरेश लांडगे, विठ्ठल अप्पा चौधरी, शंकरअप्पा उदगीरकर, मन्मथअप्पा उदगीरकर, सुर्यकांत व्यवहारे, अशोक पिंपळे, इश्वर राऊत यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. संगमेश्वर फुटके यांची संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल अध्यक्ष सुरेश लांडगे, विठ्ठलअप्पा चौधरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्री.फुटके यांचे अभिनंदन करण्यात आले.

.

No comments:

Post a comment