तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 4 September 2019

परळीत विजेचा वॉक लागुन महिला ठार तर एक जखमीपरळी वैजनाथ (प्रतिनीधी) :- 
शेळ्यांना चारा आणण्यासाठी विद्युत रोहित्राजवळ गेलेल्या महिलेस विजेचा शॉक लागुन मृत्यु झाल्याची घटना भिमनगर भागात घडली तर नागसेन नगर भागात घरामध्ये लाईट घेण्यासाठी तारेवर आकडा टाकताना एकजण जखमी झाल्याची घटना घडली असुन त्याच्यावर अंबाजोगाई स्वा.रा.ति.रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 परळी शहरात मागील दोन दिवसापासुन पाऊस सुरु आहे.शहरातील भिमनगर भागातील मालनबाई नाना जगतकर वय 55 वर्षे या आज सायंकाळी 5 वा. आपल्या शेळ्यांना चारा आणण्यासाठी भिमनगर शेजारी असलेल्या रोहित्राजवळ गेल्या पावसामुळे ओलावा निर्माण झाल्याने विजप्रवाह उतरला होता.मालनबाई रोहित्राजवळ जाताच त्यांना शॉक लागला यात त्यांचा जागीच मृत्यु झाला.त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी परळी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे.तर दुसर्या घटनेत नागसेन नगर येथील रवि राम गवळी हे आपल्या घरात लाईट घेण्यासाठी घराजवळुन जात असलेल्या विद्युत तारेवर आकडा टाकत असताना पावसामुळे निर्माण झालेल्या ओलाव्यामुळे विजप्रवाह आकडा टाकत असलेल्या बांबुत उतरल्याने विजेचा शॉक लागला यात तो गंभीर जखमी झाला असुन त्याच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

No comments:

Post a Comment