तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 12 September 2019

अभिनव विद्यालय येथील श्रीगणेश विसर्जन थाटामाटात संपन्नपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
ज्ञान प्रबोधिनी विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अभिनव विद्यालय येथे दरवर्षीप्रमाणे श्री गणेश स्थापना संस्थेचे सचिव परळी भूषण साहेबराव फड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती यानिमित्त अभिनव गणेश फेस्टिवल अंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विविध शालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये रांगोळी स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा वेशभूषा स्पर्धा इत्यादी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते एकंदरीत अकरा दिवस हा गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आज विसर्जनाच्या दिवशी संस्थेचे कार्यवाहक सूर्यकांत कातकडे सर यांच्या हस्ते श्रीगणेशाची आरती करण्यात आली व मोठ्या थाटामाटात  विसर्जनासाठी वैद्यनाथ मंदिर येथील हरी तीर्थावर घेऊन आरती करून गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले.

No comments:

Post a comment