तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 1 September 2019

परळीत पुन्हा मान्सून सक्रिय, दोन दिवसांपासून तीन महिन्यांच्या विश्रांती नंतर वरुणराजाची संततधार सुरू ; मालेवाडी, हेळंब परिसरात प्रचंड पाऊसपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी तालुक्यात व परिसरातील काही दिवसांपूर्वी पाऊसाने उघडीप दिली होती. त्यानंतर आजपासुन तालुक्यातील विश्रांती नंतर वरुणराजाची संततधार पाऊसाचे आगमन झाल्यामुळे शेतकऱ्यांत आनंदी वातावरण निर्माण झाले आहे. परळी तालुक्यातील मालेवाडी व हेळंब परिसरात प्रचंड प्रमाणात पाऊस झाल्याने नदी , ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. यागावातील गावकरी या समाधानकारक पाऊसामुळे खूश झाले आहेत .
     गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने गणेश चतुर्थीच्या तोंडावरच पुन्हा मुसळधार कोसळण्यास सुरुवात केली. संपूर्ण जिल्ह्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू आहे.
     जिल्ह्यात श्री गणेशाच्या आगमनाचे वेध लागले असून गणेश भक्त बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. बाप्पाच्या स्वागताची तयारी जोरदार सुरू असल्याचे चित्र सध्या घराघरांत पहावयास मिळत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून उघडीप दिली होती. आता संततधार पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 
      दरम्यानच्या कालावधीत पावसाने पूर्णपणे उसंत घेतली होती. त्यामुळे गणेश भक्तांना बाप्पाच्या आगमनाची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला.  पावसाची संततधार सुरूच असल्याने गणेश चतुर्थी बाजारावर देखील याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.  
      परळी तालुक्यात व परिसरात गेल्या तीन महिन्यांच्या कालावधी नंतर आज दि. ३१ रोजी सायंकाळी पासून  तीन महीण्याच्यां विश्रांती नंतर वरुणराजा परळी तालुक्यात व परिसरात जोरदार बरसला त्यामुळे तहानलेल्या बळीराजा च्या चेहऱ्यावर चैतन्य आले असुन नदी पात्रात बंधाऱ्यातले नाल्यातले, रस्त्यावरचं  पानी...पानी...पानीच ...पाणी पाहून तिथे तिन वर्षे लोटली त्या बंधाऱ्यात पानी आलेले पाहुन आज शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.

@@@@@@@@@

मालेवाडी, हेळंब परिसरात आज संध्याकाळी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला.  डोंगराच्या माथ्यावर येणाऱ्या पाण्याने यागावातील नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत .तसे कुठल्याही प्रकारे घाबारण्याची गरज नाही .याभागातील  पाऊसाचे  परळी तहसील प्रशासकीय यंत्रणा घेत असून सतत संपर्कात आहेत .बरेच वर्षांनी या नदीच्या पुलावरुन  पाणी वाहते  आहे.आणि विशेष म्हणजे परळी तालुक्यात यापावसळ्यातपुलावरुन पाणी वाहण्याची पहिलीच वेळ आहे. यापरिसरातील पिण्याच्या पाण्यासाठी पशुधन ञस्त होती. ती चिंता दूर झाल्यामुळे  आनंद व्यक्त होत आहे .
              मालेवाडी येथील तलाठी आणि ग्रामस्थांची संपर्क झाले थोडावेळ मुसळधार पाऊस झाल्यामुळे आणि डोंगराळ भाग असल्यामुळे पाणी डोंगर उतरायला वाहत होते पण आता पाऊस कमी झाला आहे ढगफुटी सारखे कोणतीही घटना घडली नाही मालेवाडी परळी मंडलमध्ये येथे पर्जन्यमापक नोंद तपासली असता आतापर्यंत 22 एमएम पावसाची नोंद परळी मंडलमध्ये झालेली आहे इतर मंडलमध्ये हलका पाऊस पडत आहे.

No comments:

Post a comment